Swami Prasad Maurya Twitter/ ANI
देश

Watch Video: 'हिंदू महासभेमुळे देशाची फाळणी झाली...' समाजवादी पक्षाच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Manish Jadhav

Pakistan-India Partition Hindu Maha Sabha Jinnah Swami Prasad Maurya: समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जातात. भारत-पाकिस्तान फाळणीबाबत त्यांनी आता एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

मोर्या म्हणाले की, 'हिंदू महासभेने सर्वप्रथम हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची मागणी केली आणि परिणामी भारत आणि पाकिस्तानची निर्मिती झाली. भारत आणि पाकिस्तानची फाळणी जीनांमुळे झाली नाही. हिंदू महासभेमुळेच देशाची फाळणी झाली.'

पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला

मौर्य पुढे म्हणाले की, 'घटनेनुसार जात, लिंग आणि धर्माच्या आधारावर व्यक्तींमध्ये भेदभाव करता येत नाही. मात्र, हिंदु राष्ट्रासंबंधी गप्पा मारणारे देशाचे शत्रू आहेत.' बांदा येथे आयोजित बौद्ध महोत्सवाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना मौर्य यांनी हे वक्तव्य केले.

यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, 'पंतप्रधान मोदी अमेरिका आणि फ्रान्समध्ये (France) गेले तेव्हा त्यांनी हिंदू धर्म हा धर्म नसून जीवनपद्धती असल्याचे सांगितले. मात्र, याबाबत आम्ही बोलले असता गदारोळ झाला.

मला शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली

कार्यक्रमाला संबोधित करताना मौर्य पुढे म्हणाले की, 'पंतप्रधानांनंतर त्यांच्या सरकारचे (Government) मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की, हिंदू धर्म हा धर्म नसून जीवनपद्धती आहे. दुसरीकडे मात्र, मला शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली.

विशेष म्हणजे, शिरच्छेद करणाऱ्याला बक्षीस देण्याचा दावाही करण्यात आला.' मोर्या पुढे असेही म्हणाले की, 'अखिलेश यादव यांनी बंगला खाली केला तेव्हा तो गोमूत्र आणि गंगाजलाने स्वच्छ करण्यात आला. या सरकारमध्ये शूद्रांचा सातत्याने अपमान होत आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT