BIlawal Bhutto | S. Jaishankar Dainik Gomantak
देश

Bilawal Bhutto: पंतप्रधान मोदींबाबत बोलताना भुट्टोंची जीभ घसरली; '1971' विसरला काय? भारताचा खोचक सवाल

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे पाकला सडेतोड प्रत्युत्तर

Akshay Nirmale

Bilawal Bhutto: पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी संयुक्त राष्ट्रात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावर भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांचे वक्तव्य अत्यंत असभ्य असून पाकिस्तान 1971'' विसरला आहे, असा खोचक टोला, भारताने पाकिस्तानला लगावला आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींबाबत पाकिस्तानने केलेल्या टिपण्णीतून पाकने अत्यंत खालच्या स्तराचा नीचांक गाठला आहे. पाकचे परराष्ट्र मंत्री 1971 मधील दिवस उघडपणे विसरले आहेत. तो दिवस म्हणजेच बांग्लादेश मुक्तीचा दिवस हा पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी बंगाली आणि हिंदूंवर केलेल्या नरसंहाराचा परिणाम होता. पाकिस्तानने आपली विचारसरणी बदलावी, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, पाकिस्तान हा ओसामा बिन लादेनचा हुतात्मा म्हणून गौरव करणारा आणि लखवी, हाफिज सईद, मसूद अझहर, साजिद मीर आणि दाऊद इब्राहिमसारख्या दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानी दहशतवादी अजमलच्या गोळ्यांपासून 20 गर्भवतींचे प्राण वाचवणाऱ्या मुंबईतील नर्स अंजली कुलथे यांची साक्ष अधिक गांभीर्याने ऐकायला हवी होती. पाकिस्तानने मानसिकता बदलण्याची गरज आहे.

काय म्हणाले होते बिलावल भुट्टो?

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला फटकारले गेल्यानंतर पाकिस्तानचे संतप्त परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी न्यूयॉर्कमधील पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींना 'गुजरातचा कसाई' असे संबोधले होते. ओसामा बिन लादेन मेला आहे, पण गुजरातचा कसाई नरेंद्र मोदी अजूनही जिवंत आहे, असे ते म्हणाले होते.

केंद्रीय मंत्र्यांकडून पलटवार

केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, कोविड काळात पंतप्रधानांनी पाकिस्तानला मदत केली होती. काश्मीर आणि पंजाबमधील दहशतवाद पाकिस्तानमुळेच आहे. बिलावल भुट्टो यांनी केलेले निराधार विधान पाकिस्तान आणि त्यांची मानसिक दिवाळखोरी दर्शवते. पाकिस्तान आणि अपयशाकडे वाटचाल करणाऱ्या एका अयशस्वी नेत्याचे हे विधान आहे. पाकिस्तानला जगात किंमत नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, त्याच प्रकारे त्यांच्या वक्तव्याकडेही दुर्लक्ष केले पाहिजे. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पूर्वजांनी जगात दहशतवाद पसरवला आहे. सर्व दहशतवादी पाकिस्तानात लपले आहेत.

तर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले होते की, 1971 च्या या दिवशी भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्कराला ज्या प्रकारे पराभूत केले, त्यामुळे कदाचित त्यांना अजूनही वेदना होत असतील. त्यानंतरही पाकिस्तानने दहशतवादी वाढवण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. दहशतवादाविरोधात कोणी सातत्याने कठोर कारवाई केली असेल, तर ती मोदी सरकारनेच केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

SCROLL FOR NEXT