Boston Tea Party: अमेरिकन नागरिकांनी 300 पेक्षा जास्त चहाच्या पेट्या समुद्रात फेकल्या..आणि मग घडला इतिहास

16 डिसेंबर 1773 रोजी अमेरिकेन नागरीकांनी ब्रिटनहुन आलेल्या 342 चहाच्या पेट्या समुद्रात फेकल्या. अमेरिकन इतिहासातला हा अत्यंत महत्त्वाचा दिवस होता
Boston Tea Party | American Revolution
Boston Tea Party | American Revolution Dainik Gomantak
Published on
Updated on

Boston Tea Party: 16 डिसेंबर 1773. अमेरिकेच्या बोस्टन इथं काही अमेरिकन नागरिक गटागटाने हजारोंच्या संख्येने जमा झाले. ब्रिटीशांच्या वसाहतीक धोरणांना कंटाळलेले अमेरिकन्स काही क्रांतिकारक कृती करण्याच्या तयारीत होते. त्याच दिवशी सकाळी झालेल्या एका बैठकीत काहीही झाले तरी चहावर लादलेला कर द्यायचा नाहीच असा निर्णय घेण्यात आला.

त्या दिवशी ब्रिटीश ईस्‍ट इंडिया कंपनीची चहाच्या पेट्यांनी भरलेली 'डार्थमाऊथ, बीवर आणि एलेनॉर अशी 3 जहाजं ग्रिफिनच्या व्‍हार्फ इथं पोहोचली. या तिन्ही जहाजावर चीनमधुन आलेल्या चहाच्या पेट्या होत्या. चहावर कर लावल्याने अमेरिकन्स संतापले होते. याआधीही ब्रिटीशांनी मनमानी कर लावुन अमेरिकेचे शोषण केले होते.

या काळात अमेरिकन नागरीकांचं 'सन ऑफ लिबर्टी' (Sons of Liberty) नावाचं एक मोठं संघटन उभं राहिलं होतं. ब्रिटीशांच्या मनमानी धोरणाला या संघटनेचा मोठा विरोध होता. 16 डिसेंबर याच दिवशी या संघटनेचे कार्यकर्ते आणि अमेरिकन नागरिक दिवसभर बोस्टन बंदरावर जमु लागले.

या बैठकीत हेही ठरले कि, जहाजांमधुन आलेला चहा आपण वापरायचा नाही, आलेला चहा स्वीकारायचाही नाही आणि ठेवायचाही नाही. या सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे आलेली तिन्ही जहाजं अमेरिकेत तयार झाली होती आणि त्याचा मालकही अमेरिकन होता.

16 डिसेंबर 1773 या रात्री लोक मोठ्या संख्येने जहाजांवर चढले, आणि त्यांनी चहाच्या पेट्या समुद्रात फेकायला सुरूवात केली. यावेळी 342 पेट्या समुद्रात फेकल्या गेल्या. अमेरिकन नागरिकांनी ब्रिटीशांच्या धोरणांचा निषेध केला. हा दिवस अमेरिकन इतिहासात क्रांतीची ठिणगी पेटवणारा ठरला.

Boston Tea Party | American Revolution
Divya Rane: गोव्यात लवकरच बॉटनिकल उद्यानात योगा अन् नॅचरोपथी प्रकल्पांचे आगमन

ही घटना अचानक नाही घडली. या संघर्षाची बीजं आधीच पेरली गेली होती. ब्रिटिशांसाठी अमेरीका ही एक आर्थिक लाभ देणारी एक वसाहत होती. या वसाहतीचे आर्थिक शोषण ब्रिटीश करत होते. 1765 साली ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने प्रिंटेड पेपरवर कर लावला.त्यात खेळण्याचे पत्ते, वर्तमानपत्र, व्यापारी परवाने आणि कायदेशीर कागदपत्रं या सगळ्यांचा समावेश होता.

या सगळ्यावर ब्रिटीशांचं मत असं होतं हा कर अमेरिकेसाठी लढल्या गेलेल्या युद्धासाठी गोळा करण्यात येत आहे ;पण अमेरीकन लोकांना मात्र हा मुद्गा पटत नव्हता आणि त्यातुन हा सगळा संघर्ष उभा राहिला.

या घटनेनं केवळ अमेरिकेच्याच नाही तर जगाच्या इतिहासावर दुरगामी परिणाम झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com