Pahalgam Terror Attack Dainik Gomantak
देश

Pahalgam Terror Attack: "आमच्यावर हल्ला झाल्यास पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर देऊ, भारतावर अण्वस्त्र हल्लाही करू", पाकिस्तानच्या राजदूताची दर्पोक्ती

Pahalgam Attack: ‘आमच्यावर हल्ला झाल्यास किंवा आमच्या नद्यांचे पाणी रोखल्यास आम्ही पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर देऊ,’’ अशी दर्पोक्ती पाकिस्तानच्या मॉस्कोमधील राजदूताने दिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मॉस्को : ‘‘आमच्यावर हल्ला झाल्यास किंवा आमच्या नद्यांचे पाणी रोखल्यास आम्ही पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर देऊ,’’ अशी दर्पोक्ती पाकिस्तानच्या मॉस्कोमधील राजदूताने दिली आहे. तसेच, अण्वस्त्र हल्ल्याची शक्यताही राजदूत महंमद खालिद जमाली यांनी नाकारली नाही. रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले.

जमाली म्हणाले,‘‘पाकिस्तानवर कोणतेही संकट आल्यास त्याचा सामना करण्यास आम्ही सक्षम आहोत. आमच्यावर हल्ला झाल्यास पारंपरिक पद्धतीने किंवा अण्वस्त्रांचा वापर करत आम्ही पूर्ण क्षमतेने उत्तर देऊ. आमच्या देशातून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी वळविण्याचा किंवा पाणी रोखण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. अन्यथा परिणाम भोगावे लागतील.

दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे असल्याने शांततेच्या मार्गाने प्रश्‍न सोडविण्यावरच भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. जम्मू-काश्‍मीरमधील नागरिकांना स्वयंनिर्णयाचा हक्क हा दोन्ही देशांमधील वादाचा विषय आहे, असे मतही त्यांनी मांडले. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर जमाली यांनी मुलाखत दिली आहे.

सुरक्षा समितीत चर्चा होणार

भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. पाकिस्तान सध्या या समितीचा अस्थायी सदस्य असून त्यांनी केलेल्या विनंतीनंतरच ही चर्चा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT