नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान ही राष्ट्रे म्हणजेच विरोध असण्याचं ज्वलंत उदाहरण. कारण भारत आणि पाकिस्तान ही राष्ट्रांची फाळणीनंतर विभागणी झाली. जम्मू काश्मीर सारख्या अनेक मुद्यांनी दोन्ही राष्ट्रांमधील तणाव वाढतच गेला. कधी - कधी काही विषय संयुक्त राष्ट्रामध्ये चर्चीले गेले मात्र दोन्ही राष्ट्रातील तणाव कमी व्हायला तयार नाही. असे असले तरी संपुर्ण तणाव संपला आहे.(pakistan education is invalid in india)
ही पार्श्वभूमी असताना भारतीय विद्यार्थी आणि परदेशी विद्यार्थ्यांनी पाकिस्तानातील शिक्षण संस्थांमधून शिक्षण घेतल्यास ते भारतात उच्च शिक्षण आणि नोकरीच्या संधींसाठी पात्र ठरणार नाही, असे विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) स्पष्ट केले आहे. यावर स्पष्टीकरण देताना चीनमधील विद्यापीठांतून केवळ ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केलेली पदवी भारतात ग्राह्य धरली जाणार नसल्याचे यूजीसी आणि एआयसीटीई यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते.
..तरच भारतात नोकरीसाठी पात्र ठरणार
आता पाकिस्तानमधील सर्वच अभ्यासक्रमांबाबतचे स्पष्टीकरण यूजीसी आणि एआयसीटीई यांच्याकडून संयुक्त परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहे. पाकिस्तानातील शिक्षण संस्थेत शिकण्यासाठी प्रवास करू नये. पाकिस्तानातील शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयात शिक्षण घेतलेले भारतीय विद्यार्थी आणि परदेशी विद्यार्थी भारतात उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी पात्र ठरणार नाहीत, असे आयोगाने नमूद केले आहे.
दरम्यान, स्थलांतरित नागरिक आणि त्यांच्या मुलांनी पाकिस्तानातील शिक्षण संस्थेतून पदवी मिळवली असल्यास आणि त्यांना भारताकडून नागरिकत्त्व प्रदान केलेले असल्यास केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सुरक्षिततेसंदर्भातील पूर्तता केल्यानंतर ते भारतात नोकरीसाठी पात्र ठरू शकतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.