Tarek Fatah Death Dainik Gomantak
देश

Tarek Fatah Death: पाकिस्तानी वंशाचे लेखक तारेक फतेह यांचे निधन, भारताचे करायचे समर्थन

कॅनेडियन-आधारित लेखक इस्लाम आणि दहशतवादावरील प्रगतीशील विचारांसाठी ओळखले जात होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Tarek Fatah Death: पाकिस्तानी वंशाचे लेखक तारिक फतेह यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. तारिक फतेह यांची मुलगी नताशा फतेहने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे तारिक फतेह हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. तारिक यांचे निधन निश्चितच झाले आहे, पण यापुढेही त्यांची क्रांती सुरूच राहील, असे नताशाने म्हटले आहे. या क्रांतीमध्ये सर्व समर्थकांनी साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

"पंजाबचा सिंह, भारताचा पुत्र, कॅनडाचा प्रेमी, सत्याचा वक्ता, न्यायासाठी लढणारा, दलित आणि अत्याचारितांचा आवाज, तारिक फतेह यांचे निधन झाले आहे. त्यांना ओळखणाऱ्या, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी त्यांची क्रांती सुरूच राहील."

कॅनेडियन-आधारित लेखक इस्लाम आणि दहशतवादावरील प्रगतीशील विचारांसाठी ओळखले जात होते. फतेह यांनी अनेकवेळा पाकिस्तानवर टीका करताना केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला पाठिंबा दर्शवला होता.

तारिक फतेह यांचा जन्म 1949 मध्ये पाकिस्तान मध्ये झाला आणि नंतर 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला ते कॅनडात गेले. त्यांनी कॅनडामध्ये राजकीय कार्यकर्ते, पत्रकार आणि टेलिव्हिजन होस्ट म्हणून काम केले आहे आणि अनेक पुस्तके लिहिली आहेत.

तारिक फतेह इस्लाम आणि दहशतवादावर खूप मोकळेपणाने बोलत असे. त्यांची विचारसरणी, त्यांची भूमिका नेहमीच पाकिस्तानविरोधी होती. अनेक प्रसंगी त्यांनी पाकिस्तानला आरसा दाखवण्याचे काम केले होते. आता एकीकडे तो पाकिस्तानला आरसा दाखवायचा आणि दुसरीकडे त्याचा भारताबद्दलचा दृष्टिकोन नेहमीच सकारात्मक होता. प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्यावर ते आपले मत मांडायचे आणि भारताचे समर्थन करतानाही दिसायचे. त्यांनी अनेकवेळा मोदी सरकारचे कौतुकही केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Goa Assembly Election 2027: 'मी निवडणूक लढवणारच!', हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकरांनी ठोकला शड्डू; लोबोंसमोर आव्हान

खरी कुजबुज: मॅडमचा भलताच तोरा

Goa Medical College: ईएसआयसी मेडिकल कॉलेजमध्ये स्थानिकांना 50 टक्के राखीव जागा, राष्ट्रीय आरक्षण धोरणानुसार होणार भरती; गोमंतकीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर

Post Truth Politics In India: इव्हीएम, 'एसआयआर' अन् निवडणूक आयोग... विरोधकांकडून तीन प्रमुख मुद्द्यांवरून खोटा प्रचार?

SCROLL FOR NEXT