Farooq Abdullah Dainik Gomantak
देश

Farooq Abdullah: ''काश्मीरचीही गाझासारखी अवस्था होईल...''; फारुख अब्दुल्ला पुन्हा बोलले

Farooq Abdullah: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले.

Manish Jadhav

Farooq Abdullah: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले. त्यांनी भारत सरकारला शेजारील देश पाकिस्तानशी चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय, चर्चेला होणाऱ्या विलंबाबाबतही त्यांनी मोदी सरकारला धारेवर धरले. यावेळी त्यांनी 'आमचीही अवस्था गाझासारखी होईल' असा इशाराही दिला.

मंगळवारी अब्दुल्ला म्हणाले की, 'अटल बिहारी वाजपेयीजी म्हणाले होते की मित्र बदलता येतात, पण शेजारी बदलता येत नाहीत. आपण आपल्या शेजाऱ्यांशी मैत्रीपूर्ण राहिलो तर दोघांचीही प्रगती होईल.' सध्या युद्ध हा पर्याय नाही आणि हे प्रकरण चर्चेने सोडवले पाहिजे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

ते पुढे म्हणाले की, 'संवाद कुठे आहे? नवाझ शरीफ (पाकिस्तानचे) पंतप्रधान होणार आहेत आणि ते म्हणतात की आम्ही (भारताशी) चर्चेसाठी तयार आहोत. पण आपण वाटाघाटी करायला तयार नाही याचे कारण काय? जर चर्चेतून तोडगा निघाला नाही तर आपलीही परिस्थिती गाझा आणि पॅलेस्टाईनसारखी होईल, ज्यावर इस्रायल बॉम्ब हल्ले करत आहे...'

विशेष म्हणजे, अब्दुल्ला यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा नुकतेच पूंछमध्ये भारतीय लष्कराचे पाच जवान शहीद झाले. याशिवाय, बारामुल्ला येथील एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मशिदीमध्येच गोळ्या घालण्यात आल्या. एवढेच नाही तर जवानांकडून चौकशी केल्यानंतर तीन नागरिकांचाही मृत्यू झाला होता.

पाकिस्तानमध्ये निवडणुका

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने नुकतेच निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 8 फेब्रुवारी 2024 रोजी देशात निवडणुका होणार आहेत. सध्या, ECP उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची तपासणी करत आहे. ही प्रक्रिया 30 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. नामनिर्देशनपत्रांवरील दावे आणि हरकती 3 जानेवारीपर्यंत दाखल करता येतील आणि 10 जानेवारीपर्यंत निर्णय घेतला जाईल. आयोग 11 जानेवारीला उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT