Farooq Abdullah: भारतीय सेनेविरुध्द फारुख अब्दुल्लांनी ओकली गरळ, म्हणाले...

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्ला यांची सोमवारी नॅशनल कॉन्फरन्सच्या (NC) अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.
 Farooq Abdullah
Farooq AbdullahDainik Gomantak

Jammu Kashmir News: फारुख अब्दुल्ला यांची सोमवारी नॅशनल कॉन्फरन्सच्या (NC) अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. दरम्यान, फारुख यांनी पुन्हा एकदा भारतीय लष्करावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, 'मी मुख्यमंत्री असताना लष्कराने मतदान केंद्रावर कब्जा केला होता. डोडामध्ये मतदारांना त्यांचा हक्क बजावू दिला नव्हता. याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत.'

फारुख अब्दुल्ला यांनी लष्करावर आरोप केला

फारुख अब्दुल्लांनी (Farooq Abdullah) लष्करावर आरोप सुरु ठेवताना मतदान यंत्र लष्कराच्या छावणीतच ठेवण्यात आल्याचे सांगितले. 'आता मी सैन्याला असे पुन्हा करु नये असा इशारा देऊ इच्छितो. निवडणुकीत हस्तक्षेप करु नका. मला सरकारला सांगायचे आहे की, निवडणुकीत हस्तक्षेप करु नका, अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील. आम्ही आमचे प्राण द्यायला सुध्दा तयार आहोत,' असेही अब्दुल्ला म्हणाले.

 Farooq Abdullah
Farooq Abdullah Resigns: फारुख अब्दुल्लांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) कुपवाडा आणि बांदीपोरा जिल्ह्यातील दोन जिल्हा विकास परिषद किंवा डीडीसी जागांवर सध्या पुन्हा मतदान सुरु आहे. या जागांवरील उमेदवारांवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर या जागांची मतमोजणी थांबवण्यात आली.

नॅशनल कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदी फेरनिवड

नसीम बाग येथे पक्षाचे संस्थापक शेख मोहम्मद अब्दुल्ला यांच्या समाधीजवळ आयोजित नॅशनल कॉन्फरन्सच्या प्रातिनिधिक अधिवेशनात 85 वर्षीय फारुख यांची पक्षप्रमुख म्हणून एकमताने निवड करण्यात आली. शेख अब्दुल्ला यांची 117 वी जयंतीही यावेळी साजरी करण्यात आली.

 Farooq Abdullah
Farooq Abdullah यांच्याविरुद्ध ED ने दाखल केली सप्लीमेंट्री चार्जशीट

दुसरीकडे, नॅशनल कॉन्फरन्सचे सरचिटणीस अली मोहम्मद सागर यांनी सांगितले की, 'अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत फक्त अब्दुल्ला यांचाच अर्ज आला होता.' सागर पुढे म्हणाले की, 'फारुख अब्दुल्ला यांच्या समर्थनार्थ काश्मीरमधून एकूण 183, जम्मूमधून 396 आणि लडाखमधून 25 प्रस्ताव आले आहेत.'

5 वर्षांपूर्वी एनसी अध्यक्षपदी निवड झाली

फारुक यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा देण्याची इच्छा नुकतीच व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षाने अध्यक्षाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु केली होती. पक्षाच्या प्रातिनिधिक अधिवेशनात नवा अध्यक्ष निवडला जाईल, असे सांगण्यात आले होते. नॅशनल कॉन्फरन्सची शेवटची अध्यक्षपदाची निवडणूक पाच वर्षांपूर्वी झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com