Rajnath Singh  @ani_digital
देश

Rajnath Singh: 'त्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही कर्म बघून दहशवाद्यांना बेचिराख केलं', श्रीनगरमध्ये गरजले राजनाथ सिंह

Rajnath Singh on Operation Sindoor: देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी (15 मे) श्रीनगर येथील बदामी बाग छावणीला भेट दिली. ऑपरेशन सिंदूर नंतर राजनाथ सिंह यांचा काश्मीर खोऱ्यातील हा पहिलाच दौरा आहे. सिंह यांनी यावेळी बोलताना पाकिस्तानवर हल्लाबोल केला.

Manish Jadhav

भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकड्यांची चांगलीच जिरवली. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानची खोड मोडली. त्यानंतर दोन्ही देशातील वाढता तणाव लक्षात घेता अमेरिकेने मध्यस्थी करत युद्धबंदी केली. भारताने पाकिस्तानातील ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांचे तळ उडवून लावले. भारतीय लष्कराने यशस्वी कारवाई केली. याच पार्श्वभूमीवर, देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी (15 मे) श्रीनगर येथील बदामी बाग छावणीला भेट दिली. ऑपरेशन सिंदूर नंतर राजनाथ सिंह यांचा काश्मीर खोऱ्यातील हा पहिलाच दौरा आहे. सिंह यांनी यावेळी बोलताना पाकिस्तानवर हल्लाबोल केला.

काय म्हणाले संरक्षणमंत्री?

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी श्रीनगरमधून पाकिस्तानच्या नापाक हरकतींचा बुरखा फाडला. सैनिकांना संबोधित करताना सिंह म्हणाले की, ''मी सैनिकांच्या हौतात्म्याला सलाम करतो. ऑपरेशन सिंदूरदरम्यान तुम्ही जे काही केले त्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. संरक्षणमंत्री आणि एक नागरिक म्हणून मी तुमचे आभार मानू इच्छितो. यावेळी जम्मू आणि काश्मीरच्या लोकांनी दाखवलेली एकताही महत्त्वाची ठरली.''

सिंह पुढे म्हणाले की, 'तुम्ही पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ शोधून नष्ट केले. भारत दहशवाद्यांविरोधात कठोर कारवाई करतो हे पुन्हा एकदा आपण दाखवून दिले. ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या इतिहासातील दहशतवादाविरोधात केलेली सर्वात मोठी कारवाई आहे.'

पाकिस्तानची अण्वस्त्रे आयएईएच्या देखरेखीखाली आणली पाहिजेत

सिंह पुढे म्हणाले की, 'भारताने (India) पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिले. पाकिस्तानने दहशतवादासाठी आपल्या भूमीचा वापर थांबवावा. मी संपूर्ण जगाला विचारतो की अशा बेजबाबदार आणि दुष्ट राष्ट्राच्या हातात अण्वस्त्रे सुरक्षित खरचं राहतील का? माझा असा विश्वास आहे की, पाकिस्तानची अण्वस्त्रे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) देखरेखीखाली आणली पाहिजेत.'

सिंह पुढे असेही म्हणाले की, 'पंतप्रधान मोदींनी म्हटल्याप्रमाणे दहशतवाद आणि संवाद एकत्र चालू शकत नाहीत. जर काही चर्चा होईल तर ती फक्त दहशतवादावरच असेल. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना धर्म विचारुन मारले परंतु तर भारताने त्यांच्या कृतींच्या आधारे त्यांना नष्ट केले.'

जम्मूमध्ये 15 मे पासून शाळा सुरु होणार

जम्मूच्या शालेय शिक्षण संचालनालयाने बुधवारी घोषणा केली की, जम्मू आणि काश्मीरच्या काही सीमावर्ती भागातील शाळा 15 मे रोजी पुन्हा सुरु होतील. ही बातमी विद्यार्थी आणि पालकांसाठी दिलासादायक आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, जम्मूतील सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातील अनेक भागात 15 मे पासून शाळा सुरु होतील.

त्याचप्रमाणे राजौरी, पेरी, कालाकोट, थनमंडी, मोगला, कोटरंका, खवास, लोअर हाथल आणि दारहाल भागातही अनेक दिवसांनी शाळा सुरु होतील. पूंछमधील सुरनकोट आणि बुफलियाझमध्येही परिस्थिती सुधारल्यानंतर 15 मे पासून विद्यार्थी शाळेत जाऊ शकतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT