Krk And Yogi Adityanath Dainik Gomantak
देश

योगींचा पराभव झाला तरच भारतात; केआरकेने घेतली शपथ

चित्रपट समीक्षक आणि अभिनेता कमाल रशीद खान म्हणजेच केआरकेचे एक ट्विट चर्चेत आहे. खरं तर, केआरकेने योगी आदित्यनाथ यांना थेट आव्हान.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांमध्ये निवडणुकीचे वातावरण सुरू आहे. तिसरा टप्पा 20 फेब्रुवारीला आहे. दरम्यान, चित्रपट समीक्षक आणि अभिनेता कमाल रशीद खान म्हणजेच केआरकेचे एक ट्विट चर्चेत आहे. खरं तर, केआरकेने योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना थेट आव्हान दिले आहे आणि शपथ घेतली आहे की जर योगी पराभूत झाले नाहीत तर ते कधीही भारतात परतणार नाहीत. वास्तविक केआरकेने ट्विट करून लिहिले की, आज मी शपथ घेतो की 10 मार्च 2022 रोजी योगींचा पराभव झाला नाही, तर मी भारतात परत येणार नाही. जय बजरंग बली . केआरकेच्या या ट्विटरवर लोक उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत.

एका वापरकर्त्याने KRK ची 16 मार्च 2014 रोजीची पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये KRK पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरसोबत दिसत आहे. तेव्हा केआरकेने लिहिले होते की, जर मोदीजी जिंकले तर मी कायमचा भारत सोडत आहे. यावर युजरने लिहिले की, मोदींच्या विजयावर तुम्ही 2015 मध्येच भारत सोडला होता.

केआरके त्याच्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत असतो. तो बॉलिवूड (Bollywood) आणि खासकरून सलमान खानला नेहमी टार्गेट करत असतो. त्याचवेळी ते ट्विटरवर विचित्र अंदाज सुध्दा करत राहतात. याआधी केआरकेने गहराईबाबत सुध्दा वादग्रस्त ट्विट केले होते.

विशेष म्हणजे यूपी निवडणुकीचा (Election) निकाल हा 10 मार्चला लागणार आहे. यूपीमध्ये पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारीला आणि दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारीला मतदान झाले आहे. यूपीमध्ये सात टप्प्यात निवडणुका होत आहेत. आता पुढील टप्प्यात 20, 23, 27 फेब्रुवारी, आणि 3 मार्च व 7 मार्च रोजी मतदान होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT