West Bengal Chief Minister Mamata Banerjee
West Bengal Chief Minister Mamata Banerjee Dainik Gomantak
देश

''अच्छे दिन येणार... आम्ही घाबरत नाही'': मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

दैनिक गोमन्तक

कोलकाता: ईदच्या निमित्ताने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकात्याच्या रेड रोडवरुन संबोधित करताना म्हटले की, ''अच्छे दिन येतील... आम्ही घाबरत नाही, आम्हाला कसे लढायचे हे माहित आहे. आज देशात फूट पाडा आणि राज्य करा च्या धोरणाचा अवलंब केला जात आहे. देशाचं राजकारण खूप वेगळ्या दिशेने जात आहे. आपल्याला देशात (Country) एकता निर्माण करायची आहे. आपण जिथे आहोत तिथून चांगला भारत आपल्या सर्वांना हवा आहे.'' (On the occasion of Eid West Bengal Chief Minister Mamata Banerjee has said that good days will come)

दरम्यान, बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) देखील गांधी मैदानावर पोहोचून ईद-उल-फित्रच्या निमित्ताने आयोजित नमाजात सहभागी झाले. यावेळी ते म्हणाले की, ''दोन वर्षांपासून कोरोनामुळशे लोक इथे येऊ शकले नाही. परंतु आता ईदच्या निमित्ताने पुन्हा मोठ्या संख्येने लोक इथे आले याचा आनंद आहे. बिहार पुढे जायला हवा, देश पुढे जायला हवा, बंधुभाव हवा.''

तसेच, पूर्व उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनीही नवी दिल्लीतील संसद मार्ग मशिदीत ईदची नमाज अदा केल्यानंतर संपूर्ण देशाला ईद मुबारक म्हटले. ''देशात शांतता नांदावी. सगळेजण एकत्र जमले आनंद आहे. कधी कधी काही लोक वेड्यासारखे वागतात, लोकांची दिशाभूल करतात, नाहीतर देशात सदैव शांतता नांदेल,'' असे अन्सारी यांनी म्हटले.

याशिवाय, बिहार सरकारमधील मंत्री शाहनवाज हुसैन म्हणाले की, 'आम्ही संपूर्ण देशातील जनतेला ईदच्या शुभेच्छा देतो. सर्वांनी बंधुभावाने राहावे, देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करा. आपल्या देशाने खूर प्रगती करावी.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT