रशिया-युक्रेन युद्धादरम्यान भारताचे युरोपसोबतचे संबंध दृढ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोपच्या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी हेही परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यांना परदेशातील मोठ्या शहरातील विमानतळावर स्पॉट करण्यात आले आहे.
राहुल गांधी (Rahul Gandhi) पाच दिवसांच्या नेपाळ (Nepal) दौऱ्यावर पोहोचले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी पाच दिवसांच्या विदेश दौऱ्यासाठी नेपाळला पोहोचले आहेत. सोमवारी संध्याकाळी ते काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिसले. या भेटीदरम्यान ते नेपाळमधील पर्यटन स्थळांना भेट देतील.
या व्हिडिओमध्ये राहुल गांधी पार्टी करताना दिसत आहेत. हा काठमांडूचा (Kathmandu) व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये राहुल गांधी एका क्लबमध्ये असल्याचे दिसत आहे. जिथे जोरात संगीत पार्टी सुरू आहे. राहुल गांधींच्या शेजारी एक महिला आहे. राहुल गांधी त्या महिलेशी बोलत आहेत. आणखी एक व्हिडिओ देखील समोर येत आहे. ज्यामध्ये राहुल गांधी बारजवळ उभे राहून मोबाईलमध्ये काहीतरी पाहत आहेत.
राहुल गांधी काठमांडूला जाणार असल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून चर्चेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राहूल गांधी त्यांची मैत्रिण सुमनिमा उदास हिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गेले होते. दरम्यान राहुल गांधी काठमांडूच्या मॅरियट हॉटेलमध्ये थांबले आहेत. यादरम्यान राहुल गांधी यांच्या ट्विटर हँडलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सध्याच्या परदेश दौऱ्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला. यासोबतच वीज टंचाई आणि इतर मुद्द्यांवर राहुल गांधींनी मोदींना घेरले. राहूल गांधींच्या या परदेश दौऱ्यांची सोशल मीडियातही चर्चा झाली आहे.
राहुल गांधींबद्दल असं म्हटलं जातं की 2008 मध्ये मुंबईत दहशतवाद्यांनी कहर केला तेव्हाही ते पार्टी करत होते. याशिवाय तो बँकॉकला गेल्याच्या बातम्या अनेकदा आल्या. दरवर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला आणि ख्रिसमसच्या दिवशी राहुल गांधी इटलीमध्ये आपल्या आजीच्या घरीही जातात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.