Omicron: Opposition leaders slams on government on COVID-19 failure  Dainik Gomantak
देश

'हे तर सरकारचे अपयश',कोरोनावरून संसदेत खडाजंगी

दैनिक गोमन्तक

देशातील COVID-19 ओमिक्रॉन (Omicron) प्रकाराबाबत वाढत्या भीतीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतही (Parliament) कोविडबाबत चर्चा झाली आहे . यावेळी दोन्ही बाजूंच्या खासदारांमध्ये जोरदार वादावादीही झालेली पाहायला मिळाली . एकीकडे विरोधक केंद्रावर कोरोनाबाबत बेफिकीर असल्याचा आरोप करत असतानाच, भाजप खासदारांनी केंद्रातील मोदी सरकारच्या साथीच्या आणि लसीकरणातील (Vaccination) उत्कृष्ट कामगिरीचा पाढा वाचला. या चर्चेवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया शुक्रवारी उत्तर देणार आहेत.(Omicron: Opposition leaders slams on government on COVID-19 failure)

कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच संसदेत या विषयावर चर्चा होत असल्याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले आणि लसींच्या उपलब्धतेबाबत केंद्रावर भाजपशासित राज्ये आणि बिगर भाजप राज्यांमध्ये भेदभाव केल्याचा आरोप देखील केला आहे. याशिवाय पीएम केअर फंडाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला. सीपीआय खासदार एएम आरिफ म्हणाले की, पीएम केअर्स फंडात किती पैसे जमा झाले हे कोणालाही माहिती नाही. ते म्हणाले की, साथीच्या रोगात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लोकांना स्मशानभूमीतही जागा मिळाली नाही. लोकांचे मृतदेह नद्यांमध्ये फेकले गेले.

लोकसभेत कोरोनावर चर्चा करताना काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले की, देशातील ओमिक्रॉन प्रकारांबद्दलची वाढती चिंता लक्षात घेता सरकारने प्रत्येकाला पूर्णपणे लस देण्यावर भर दिला पाहिजे. यासह, लक्ष्यित लोकसंख्येला लसीकरण करण्यासाठी आणि ओमिक्रॉनशी निपटण्यासाठी उचललेल्या पावलांची देखील सभागृहाला माहिती द्यावी. यासह सत्ताधारी पक्षातील खासदार आणि मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारवर निशाणा साधत सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला आहे.

दुसरीकडे, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी कोरोनाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत एकामागून एक अनेक प्रश्न विचारले. कर्नाटकात समोर आलेल्या ओमिक्रॉन प्रकारांच्या दोन प्रकरणांवर सरकारला विचारण्यात आले की त्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत का ?. त्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले होते पण सरकार हे सत्य लपवत असल्याचा आरोप त्यांनी केला. यासोबतच देशात बुस्टर डोस कधीपासून सुरू होणार, असा सवालही त्यांनी सरकारला केला आहे.

यासोबतच मुलांना वाचवण्यासाठी कोणतीही लस नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे . कोरोना लसीकरणाबाबत प्रश्न उपस्थित करत याला सरकारचे अपयश असल्याचे सांगून याचमुळे देशात दुसरी लाट आल्याचे त्यांनी सांगितले आहे . ते म्हणाले की, दुसऱ्या लाटेपूर्वी सरकार झोपले होते, त्यामुळे 40 लाख लोक मरण पावले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT