Odisha Train Accident Dainik Gomantak
देश

Odisha Train Accident: चार आठवडे उलटूनही, अनेकांना प्रियजनांच्या मृतदेहाची प्रतिक्षा

Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघाताला जवळपास एक महिना होत आहे, पण आजपर्यंत अशी अनेक कुटुंबे आहेत ज्यांना त्यांच्या नातेवाईकांचे मृतदेह मिळालेले नाहीत.

Ashutosh Masgaunde

Odisha Train Accident Dead bodies: ओडिशातील बालासोर येथे २ जून रोजी भीषण रेल्वे अपघात झाला. यामध्ये तीनशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

अपघाताला 26 दिवस उलटूनही अनेक कुटुंबे अशी आहेत की ज्यांना त्यांच्या नातेवाईकांचे मृतदेह मिळालेले नाहीत. मृतदेह मिळविण्यासाठी अनेक कुटुंबांनी ओडिशात तळ ठोकला आहे.

ही मृतदेह मिळण्यास अजून चार-पाच दिवस लागतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मृतदेह देण्यापूर्वी डीएनए नमुने घेण्यात येत असून, नमुने जुळल्यानंतरच मृतदेह देण्यात येत आहेत. त्यामुळेच एवढा कालावधी लोटूनही मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देता आले नाहीत.

बसंती देवी यांचा अनुभव

बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील बारी-बलिया गावातील बसंती देवी आपल्या पतीचा मृतदेह घेण्यासाठी गेल्या १० दिवसांपासून एम्सजवळील एका निर्जन भागात असलेल्या 'गेस्ट हाऊस'मध्ये तळ ठोकून आहेत.

ओल्या डोळ्यांनी त्या म्हणाल्या, 'मी इथे माझे पती योगेंद्र पासवान यांच्यासाठी आले आहे. ते मजूर होते, बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसने घरी परतत असताना बहनगा बाजार येथे अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

मृतदेह कधी मिळेल, याबाबत अधिकाऱ्यांनी कोणतीही वेळ दिली नसल्याचा दावा त्यांनी केला. बसंती देवी म्हणाल्या, 'काही अधिकारी म्हणतात की अजून पाच दिवस लागतील, तर काहींच्या मते अजून वेळ लागेल. प्रशासनाकडून स्पष्टता नाही.

तसेच बिहारमधील मुझफ्फरपूर येथील राजकाली देवीही पतीच्या मृतदेहाची वाट पाहत आहेत. ही घटना घडली तेव्हा तिचे पती चेन्नईला जात होते.

एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, ते दावेदारांना त्यांचे डीएनए नमुने देण्याचे आवाहन करत आहेत. ते म्हणाले, 'आम्ही एम्स आणि राज्य सरकारमधील सेतूप्रमाणे आहोत.'

चार जूनपासून आजोबांना मिळेना नातवाचा मृतदेह

४ जूनपासून आपला नातू सूरज कुमारच्या मृतदेहाची वाट पाहत असलेल्या पूर्णिया येथील नारायण ऋषीदेव यांचीही अशीच स्थिती आहे. सूरज कोरोमंडल एक्सप्रेसने चेन्नईला जात होता.

दहावी झाल्यानंतर सूरज नोकरीच्या शोधात चेन्नईला जात होता. ते म्हणाले, 'अधिकार्‍यांनी माझा डीएनए नमुना घेतला आहे पण त्याचा अहवाल येणे बाकी आहे.'

अजूनही पटली नाही 81 मृतदेहांची ओळख

दरम्यान, भुवनेश्वर एम्समध्ये तीन कंटेनरमध्ये जतन केलेल्या 81 मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. आतापर्यंत एकूण ८४ कुटुंबांनी डीएनए नमुने दिले आहेत.

चेन्नई-जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस, हावडा-जाणारी SMVP-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मालगाडी यांचा 2 जून रोजी बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्टेशनजवळ भीषण अपघात झाला. यामध्ये सुमारे 300 लोकांचा मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Today Live Updates: डिचोलीत 24 नोव्हेंबरला 'नवा सोमवार'; शांतादुर्गा देवीचा प्रसिद्ध उत्सव रंगणार

Ranji Trophy 2025: 5 विकेट गेल्या, पंजाबच्या कर्णधाराचे झुंझार शतक; महत्वाच्या सामन्यात गोव्याची पकड ढिली

Goa Sand Extraction: वाळू व्यवसायाच्या वादातून गोळीबार, पेडणे पोलिसांची मोठी कारवाई; 5 संशयितांना ठोकल्या बेड्या

Goa Politics: खरी कुजबुज; ‘गोंय विकले घाटार’

Mhaje Ghar: 'फोंड्याला पोरका समजू नका'! CM सावंतांचे भावनिक आवाहन; घरे कायदेशीर करून देणार असल्याची दिली ग्वाही

SCROLL FOR NEXT