Agra Crime News
Agra Crime NewsDainik Gomantak

Agra Crime News: कुऱ्हाडीचे वार अन् धडापासून वेगळे! सुनांच्या भांडणाचा सासऱ्याला संताप; संधी मिळताच केला धाकटीचा घात

Agra: अल्पवयीन सुनेची हत्या करणाऱ्या सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. आग्रा (पश्चिम)चे एसीपी सोनम कुमार यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे.
Published on

UP Crime News: आग्र्यातील किरौली भागातील मलिकपूर गावात महिलेची हत्या झाल्याची बातमी समजताच खळबळ उडाली.

किरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलिकपूर गावात सासऱ्याने आपल्याच अल्पवयीन सुनेचा गळा चिरून खून केला. या खळबळजनक प्रकाराचे वृत्त गावात पसरताच गावातील लोक हळहळले.

प्रथमदर्शनी कौटुंबिक वाद, या हत्येचे कारण सांगितले जात आहे. मुलीच्या हत्येची माहिती मिळताच मृताचे नातेवाईकही घटनास्थळी पोहोचले.

मंगळवारी सकाळी सून प्रियंका चुलीवर स्वयंपाक बनवत असताना ही घटना घडली. त्यानंतर अचानक मागून आलेल्या सासऱ्याच्या रघुवीरने सुनेवर कुऱ्हाडीने वार करून सुनेचा गळा चिरून खून केला.

आरोपी गजाआड

या हत्येची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र, पोलीस येण्यापूर्वीच सासरच्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र फरार आरोपी सासऱ्याला पोलिसांनी पकडले. सध्या पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. या नराधम सासऱ्याचे नाव रधुवीर सिंग असे असून, तो 62 वर्षांचा आहे.

सासऱ्याने आपल्या 26 वर्षीय सुनेची घरगुती वादातून हत्या केली. पीडिता घरी स्वयंपाक करत असताना, आरोपीने तिच्यावर मागून हल्ला केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सोनम कुमार: एसीपी, आग्रा (पश्चिम)
Agra Crime News
Kerala Crime: ३३ वर्षापूर्वी खून, covid मुळे मृत्यूचा संशय, मग मुंबईत गेल्याची टीप; २७ वर्षापासून चकवा देणारी महिला अखेर जाळ्यात अडकलीच

ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला दोन मुले होती. मोठ्या मुलाचे निधन झाले आहे, तर लहान मुलगा यूपी पोलिसात आहे. त्याची पत्नी प्रियंका यांना दोन मुली आहेत. ही घटना घडली तेव्हा घरात फक्त प्रियंका आणि तिचे आरोपी सासरे उपस्थित होते.

आरोपीने सांगितले की, मला दोन्ही सुनांना एकत्र ठेवायचे होते, मात्र त्यांच्यात वारंवार भांडणे होत असल्याने कुटुंबात कलह निर्माण झाला.

पोलीस अधिकारी, सोनम कुमार यांनी सांगितले की, सोमवारी रात्री दोन सूनांमधील वाद वाढला आणि जेव्हा रघुवीरने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रियंकाने त्याला लाथ मारली.

त्यानंतर प्रियंका स्वयंपाक करत असताना त्याने तिच्यावर कुऱ्हाडीने वार करून तिचे शिर धडापासून वेगळे केले.

Agra Crime News
Adipurush Controversy: "काही गोष्टींना तुम्ही हात लावायला नको होता; हायकोर्टाने लेखक, निर्मात्यांसह सेन्सॉर बोर्डालाही फटकारले

रघुवीरने पोलिसांना सांगितले की, त्याच्या मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर, विधवा सून तिच्या सासरच्या ठिकाणी राहत होती. आणि तिची लहान जाव प्रियंकासोबत वारंवार भांडणे होत होती.

किरवलीचे एसएचओ उपेंद्र कुमार श्रीवास्तव म्हणाले, आरोपीचा मुलगा पोलीस हवालदार असून, तो घटनेच्या वेळी फारुखाबाद येथे कर्तव्यावर होता. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे, रघुवीर आणि पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com