Hijab Controversy: "हे शक्य नाही"; ऑपरेशन थिएटरमध्ये हिजाब घालण्याची मागणी कॉलेजने फेटाळली

Hijab Row: मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सात मुस्लिम विद्यार्थिनींनी ऑपरेशन थिएटरमध्ये हिजाब घालण्याची परवानगी मागितली.
Hijab Controversy:
Hijab Controversy:
Published on
Updated on

Hijab Operating theater: कर्नाटकातून सुरू झालेला हिजाबचा वाद, सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी प्रलंबित आहे. असे असले तरी, देशाच्या विविध राज्यांमध्ये हिजाब वेळोवेळी डोके वर काढत आहे.

आता असाच एक प्रकार केरळमध्येही समोर आला आहे. केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या 7 विद्यार्थ्यांच्या गटाने मुख्याध्यापकांना पत्र लिहिले आहे.

या पत्रात त्यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये हिजाब घालण्याची परवानगी नाकारल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. याला पर्याय म्हणून लांब बाही असलेले स्क्रब जॅकेट आणि सर्जिकल हूड घालण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे.

2020 एमबीबीएस बॅचच्या विद्यार्थिनीने लिहिलेल्या या पत्रावर 2018, 2021 आणि 2022 बॅचमधील सहा विद्यार्थिनींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पत्रात म्हटले आहे की त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये डोके झाकण्याची परवानगी नाही. धार्मिक श्रद्धेनुसार मुस्लिम महिलांना सर्व परिस्थितीत हिजाब घालणे अनिवार्य आहे.

त्यात पुढे म्हटले आहे की, 'हिजाब परिधान करणाऱ्या महिलांना धार्मिक पोशाख परिधान करणे आणि हॉस्पिटल आणि ऑपरेटिंग रूमचे नियम पाळणे, तसेच विनयशीलता राखणे यात संतुलन राखणे कठीण जाते.'

Hijab Controversy:
Kota News: गुणवंतांच्या शहराला आत्महत्यांचा शाप! MBBS ची तयारी करणाऱ्या दोघांनी एकाच दिवशी संपवले जीवन; वर्षभरातील 15 वी घटना

काय म्हणाले प्राचार्य?

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लिनेट जे. मॉरिस यांनी विद्यार्थीनींचे पत्र मिळाल्याची पुष्टी केली. ते म्हणाले की त्यांना लांब बाही आणि हुड वापरायचा आहे.

तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेजच्या 7 विद्यार्थिनींनी केलेल्या मागणीला कॉलेजच्या प्राचार्यांनी प्रतिसाद दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॉलेजच्या प्राचार्यांनी सांगितले की, आम्ही विद्यार्थिनींना समजवण्याचा प्रयत्न केला आहे.

फुल स्लीव्ह स्क्रब जॅकेट आणि हुड वापरणे शक्य नाही, कारण प्रत्येकाला ऑपरेशनपूर्वी आणि नंतर कोपरापर्यंत पाण्याने हात धुवून निर्जंतुकीकरण करावे लागते.

मी, विद्यार्थीनींना स्पष्ट सांगितले आहे की, त्याच्या विनंतीवर निर्णय घेण्याच्या स्थितीत मी नाही. शल्यचिकित्सक आणि संसर्ग नियंत्रण तज्ज्ञांची बैठक बोलावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Hijab Controversy:
Agra Crime News: कुऱ्हाडीचे वार अन् धडापासून वेगळे! सुनांच्या भांडणाचा सासऱ्याला संताप; संधी मिळताच केला धाकटीचा घात

असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडियाचा विरोध

असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य, डॉ. राजन पी म्हणाले की आमच्याकडे जात, पंथ किंवा धर्माची पर्वा न करता जगभरात एक मानक प्रणाली आणि पद्धती आहेत.

वैद्यकीय क्षेत्रात धर्म आणण्याचा प्रयत्न करू नये. पूर्वी, नन्स थिएटरमध्ये त्यांचे धार्मिक कपडे घालत असत, परंतु त्यांनी पारंपरिक शस्त्रक्रिया कपडे घालण्यास सुरुवात केली. त्या तत्त्वांना आपण कमी लेखू नये.

गेल्या वर्षभरापासून देशातील विविध शिक्षण संस्थांमध्ये बुरख्याच्या प्रकरणावर पडदा पडला असताना आता केरळमधी हा प्रकार समोर आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com