Odisha will built Shacks, Cottages on Beach Dainik Gomantak
देश

पर्यटनवाढीसाठी ओडिशाचे गोव्याच्या पावलावर पाऊल; समुद्रकिनाऱ्यांवर बांधणार शॅक्स, कॉटेज...

पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे, मॉल, वाहनतळ, आसनव्यवस्था आदी सुविधा विकसित करणार

Akshay Nirmale

Odisha News: स्वच्छ, सुंदर आणि निसर्गसंपन्नतेने नटलेले समुद्रकिनारे ही गोव्याची ओळख आहे. त्यासाठी देशविदेशातील पर्यटक गोव्याकडे येत असतात. निसर्गाप्रमाणेच समुद्रकिनारे चांगले ठेवण्यात गोवा सरकारच्या विविध प्रयत्न, धोरणांचाही तितकाच वाटा आहे.

आता ओडिशा सरकारने देखील तेथील समुद्रकिनाऱ्यांचा गोव्याप्रमाणे विकास करण्याचे ठरवले आहे.

ओडिशा सरकार गोव्याच्या धर्तीवर किनारी शहरे विकसित करण्यासाठी अत्याधुनिक प्रकल्प तयार करत आहे. ओडिशाच्या किनारपट्टीवर 15 बीच शॅक्स बांधण्यात येणार आहेत. गोपालपूर, चांदीपूर, तलासरी, पारादीप आणि सोनपूर या ठिकाणी बीच कॉटेज बांधले जातील.

पर्यटकांसाठी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छतागृहे, पार्किंगची जागा, मार्केट कॉम्प्लेक्स, पर्यटकांसाठी आसनव्यवस्था आदी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.

(Odisha will built Shacks, Cottages on Beach like Goa)

ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार असित त्रिपाठी यांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील पर्यटन पायाभूत सुविधा विकास प्रकल्प आणि पर्यटन विकासाच्या प्रगतीचा आढावा घेताना त्रिपाठी म्हणाले की, पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी ओडिशाच्या किनारी भागातील शहरांचा गोव्याच्या धर्तीवर विकास केला जाईल.

विविध विकास प्रकल्प राबवले जातील. हे प्रकल्प पीपीपी तत्वावर उभारण्यात येतील. त्रिपाठी म्हणाले की, ओडिशात 15 बीच शॅक्स बांधण्यात येणार आहेत. गोपालपूर, चांदीपूर, तलासरी, पारादीप आणि सोनपूर या ठिकाणी बीच कॉटेज बांधले जातील.

पर्यटकांच्या हितासाठी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छतागृहे, वाहनतळ, बाजार संकुल, पर्यटकांसाठी आसनव्यवस्था आदी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.

संबळपूर येथील हिराकुड जलाशयावर महिनाभरात एक मोठे क्रूझ जहाज सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. लवकरच हिराकुड बोट क्लब स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

हरिशंकर आणि नृसिंहनाथ या दोन्ही ठिकाणी पायाभूत सुविधा आणि इतर सुविधांच्या दृष्टीने पर्यटन विकासाची कामे डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होतील, असे ते म्हणाले.

मार्केट कॉम्प्लेक्स, पार्किंग एरिया, एन्ट्री प्लाझा, स्नान घाट, टॉयलेट ब्लॉक, दुकाने आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा आधुनिक शैलीत बांधून लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

किनाऱ्यावर मद्य दुकानांचा निर्णय मागे

एप्रिल 2021 मध्ये राज्याच्या पर्यटन विभागाने समुद्र किनारी दारूची दुकाने उघडण्यासाठी 20 बीच बॅगसाठी निविदा काढल्या होत्या. मात्र, विविध स्तरातून विरोध झाल्यानंतर सरकारने आपला निर्णय मागे घेतला.

आता दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा राज्य सरकारने बेलाभूमीत दारूचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

गोव्याच्या धर्तीवर राज्यातील किनारी शहरे बनवण्यासाठी अत्याधुनिक प्रकल्प आखले जात आहेत. सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीत ते पूर्ण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT