G20 Summit: जो बिडेन यांनी दिल्लीत चाखली गोव्यातल्या 'बेबिंका'ची चव! फादर निकोलस डायस यांनी घेतली भेट

अध्यक्ष बिडेन यांनी शिखर परिषदेच्या यशासाठी, इथे आलेल्या सहभागींसाठी तसेच ज्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा करायची आहे, त्यासाठी ही प्रार्थना करण्याचे ठरवले.
Joe Biden Tasted Goa's Bebinca in G20 Summit
Joe Biden Tasted Goa's Bebinca in G20 SummitDainik Gomantak

Joe Biden Tasted Goa's Bebinca in G20 Summit

सध्या दिल्लीत G 20 ची परिषद सुरु आहे. यासाठी जगभरातील राष्ट्रप्रमुख उपस्थिती दर्शवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन देखील या परिषदेसाठी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. मात्र बैठकीला उपस्थित राहण्याआधी त्यांच्या शिष्टमंडळाने होली कम्युनियन सेवा करण्यासाठी गोव्यातील फादर निकोलस डायस यांना विनंती केली होती. यावेळी या भेटीनंतर फादर डायस यांनी गोव्यातील बेबिंका हा गोड पदार्थ बिडेन यांना भेट केला.

Joe Biden Tasted Goa's Bebinca in G20 Summit
Goa Akashvani Station: गोव्यातील 'Rainbow' मावळला! आकाशवाणीने बंद केले 30 वर्ष जुने रेडिओ स्टेशन

फादर निकोलस डायस यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे एक आठवड्यापूर्वी, यूएस दूतावासाच्या अधिकार्‍यांनी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या सांगण्यावरून आपल्याला G20 बैठकीपूर्वी दिल्लीमध्ये प्रार्थना करण्याची विनंती केली.

आपल्यासाठी ही अत्यंत भाग्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यातील बाणावलीमध्ये राहत असलेले असलेले आणि तीन दशकांहून अधिक काळ विविध धर्मोपदेशकांमध्ये कार्यरत असलेले फादर डायस यांनी या विनंतीला त्वरित प्रतिसाद दिला आणि ते दिल्लीत दाखल झाले.

यानंतर काल (शनिवारी) सकाळी 9 च्या सुमारास, फादर डायस सध्या राष्ट्राध्यक्ष बिडेन वास्तव्यास असलेल्या आयटीसी मौर्य येथे पोहोचले. त्यावेळी बिडेन यांच्यासोबत यूएस शिष्टमंडळ आणि फादर डायस साधारण 30 मिनिटांच्या होली कम्युनियन सेवेत सहभागी झाले.

ही प्रार्थना झाल्यानंतर डायस यांनी माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, 'अध्यक्ष बिडेन यांनी शिखर परिषदेच्या यशासाठी, इथे आलेल्या सहभागींसाठी तसेच ज्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा करायची आहे, त्यासाठी ही प्रार्थना करण्याचे ठरवले. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यासारख्या जागतिक नेत्यासोबत प्रार्थना आणि यशाचा विश्वास साजरा करण्याची ही सुवर्ण संधी माझ्यासाठी मोलाची होती.

प्रार्थना झाल्यानंतर, बिडेन आणि फादर डायस यांनी काहीवेळ गप्पा मारल्या. यावेळी डायस यांनी आपल्या आजीचा त्यांच्या जीवनात आणि कॅथोलिक संगोपनात कसा मोठा प्रभाव होता हे सांगितले.

तसेच भारतात समाविष्ट होत असलेला ख्रिश्चन धर्म आणि फ्रान्सिस झेवियर यांचे गोव्यात असलेल्या अमर अवशेषांबाबत बोलण्याची संधीही आपल्याला मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

शेवटी आपल्या संस्कृतीबाबत बोलत असतानाच फादर डायस यांनी बिडेनसाठी गोव्याहून आणलेली खास भेट सादर केली. गोव्यात प्रसिद्ध असलेले बेबिंका (गोवन-पोर्तुगीज गोड पदार्थ) बिडेन यांना भेट देत गोव्याच्या संस्कृतीबद्दल त्यांनी माहिती दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com