Odisha Pro T20 League Dainik Gomantak
देश

New Cricket League: क्रिडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! भारतात सुरू होणार आणखी एक टी-20 लीग, 6 संघांमध्ये रंगणार स्पर्धा

Odisha Pro T20 League: ओडिशा क्रिकेट असोसिएशनने ओडिशा प्रो टी२० लीग सुरू करण्याची घोषणा केली आहे. यात एकूण ६ संघ सहभागी होतील. या लीगचा पहिला हंगाम सप्टेंबर २०२५ मध्ये खेळवला जाईल.

Sameer Amunekar

भारतात तीन गोष्टी अत्यंत लोकप्रिय आहेत त्या म्हणजे सिनेमा, राजकारण आणि क्रिकेट. विशेषतः क्रिकेट हा देशात केवळ खेळ न राहता एक धर्मच बनला आहे. आयपीएलसारख्या भव्य स्पर्धांपासून ते विविध राज्यांच्या टी-20 लीग्सपर्यंत, देशभरात क्रिकेटची एक न संपणारी उत्सुकता पाहायला मिळते. आता याच यादीत ओडिशाचाही समावेश होणार आहे.

ओडिशा क्रिकेट असोसिएशनने (OCA) ओडिशा प्रो टी20 लीग सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. ही लीग सप्टेंबर 2025 मध्ये खेळवली जाणार असून एकूण 6 संघ यात सहभागी होणार आहेत.

युवा खेळाडूंना संधी मिळणार
ओसीएने स्पष्ट केले आहे की ही लीग तयार करण्यामागचा उद्देश, राज्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना दर्जेदार प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे हाच आहे. यामध्ये खेळाडूंना उच्च दर्जाची स्पर्धा, अनुभवी खेळाडूंशी खेळण्याची संधी, आणि राष्ट्रीय निवडकर्त्यांच्या नजरेत येण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळणार आहे.

"देशांतर्गत क्रिकेटमध्ये एक शक्ती बनेल" - संजय बेहरा

ओडिशा क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय बेहरा यांनी सांगितले, "आमचा विश्वास आहे की ओडिशा प्रो टी20 लीग ही भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास येईल."

त्यांनी पुढे सांगितले की, लीगमध्ये सहभागी होण्यासाठी फ्रँचायझींना संधी दिली जाणार असून, यासाठी ‘अभिव्यक्ती स्वारस्य’ (EOI) दस्तऐवज 7 ते 13 जुलै या कालावधीत ओसीएच्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करता येतील.

ओसीएने स्पष्ट केले आहे की फ्रँचायझी वाटप ही प्रक्रिया गुणवत्तेवर आधारित असेल आणि संपूर्ण पारदर्शकतेसह राबवली जाईल. यामुळे राज्यातील क्रिकेट अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Minister Resigned: पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांचा राजीनामा; गुरुवारी तवडकर, कामत घेणार शपथ

Viral Video: ‘डिग्रीची किंमत घटली...’! फिरायच्या नादापायी केलं ट्रक ड्रायव्हरसोबत लग्न; महिलेचा अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Toyota Camry Sprint: हायब्रिड सेडान सेगमेंटमध्ये टोयोटाचा पुन्हा धमाका! स्पोर्टी लूक आणि दमदार फीचर्स 'कॅमरी स्प्रिंट एडिशन' लॉन्च

Goa Cabinet Changes: 22 महिन्यांच्या मंत्रिपदानंतर बुधवारी संध्याकाळी सिक्वेरा; गुरुवारी सकाळी सभापती तवडकर देणार राजीनामा तर, कामतांना CM सावंतांकडून मिळाली हिंट

‘PM-CM’ना हटवणारं विधेयक संसदेत सादर, विरोधकांनी अमित शहांना घेरलं; अखेर विधेयक JPC कडे पाठवलं

SCROLL FOR NEXT