Nupur Sharma Case Dainik Gomantak
देश

Nupur Sharma Case: नुपूर शर्माने टीव्हीवर देशाची माफी मागावी- सुप्रिम कोर्ट

सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्माची याचिका फेटाळली, ज्यामध्ये त्यानी सर्व एफआयआर दिल्लीला हस्तांतरित करण्यास सांगितले होते.

दैनिक गोमन्तक

Nupur Sharma Case: भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मुहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात अनेक हिंसक घटना घडत आहेत. अलीकडेच राजस्थानमधील उदयपूर येथील टेलरच्या हत्येचे प्रकरणही याच्याशी जोडले गेले. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांना फटकारले आहे. याशिवाय दिल्ली पोलिसांनाही न्यायालयाने फटकारले आहे. 'तुमच्यामुळे संपूर्ण देशातील वातावरण बिघडले असून तुम्ही माफी मागण्यास बराच वेळ उशीर केला आहे,' असे सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मांना सुनावले. यासोबतच सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्माची याचिका फेटाळली आहे, ज्यामध्ये त्यानी सर्व एफआयआर दिल्लीला हस्तांतरित करण्यास सांगितले होते.

सुप्रीम कोर्टाने टीव्ही चॅनलला फटकारले

तुम्ही स्वतःला वकील म्हणता, तरीही तुम्ही बेजबाबदार विधान केले. सत्तेच्या जोरावर मनावर अधिराज्य गाजवता कामा नये, अशी जोरदार टीका सर्वोच्च न्यायालयाने केली. इतकेच नाही तर ज्या टीव्ही चॅनलच्या चर्चेत नुपूर शर्माने वादग्रस्त विधान केले होते, त्या वाहिनीलाही सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. चॅनलच्या अँकरने चिथावणी दिली असेल तर त्याच्यावरही गुन्हा का दाखल करू नये, असा सवाल न्यायालयाने केला.

नुपूरचा खरपूस समाचार घेत सुप्रीम कोर्टाने दिल्ली पोलिसांवरही ताशेरे ओढले आणि तुमच्यामुळेच देशातील परिस्थिती बिघडली आहे. तुम्ही माफी मागायला उशीर केला म्हणत न्यायालयाने दिल्ली पोलिसांवरही ताशेरे ओढले आणि म्हटले की, जर नुपूरच्या विरोधात पहिली एफआयआर दिल्लीत नोंदवली गेली, तर त्यावर काय कारवाई झाली?

यादरम्यान नुपूर शर्माचे वकील मनिंदर सिंग यांनी सांगितले की, टीव्हीवरील इतर काही पॅनेलचे सदस्य शिवलिंगाबद्दल वारंवार अपमानास्पद गोष्टी बोलत होते. कोणत्याही धर्माचा अपमान करण्याचा नुपूरचा हेतू नव्हता. न्यायालयाचे असे मत असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येईल, असे वकिलाने सांगितले. ज्यावर न्यायालयाने उत्तर दिले की, जबाबदारीही या स्वातंत्र्याशी निगडित आहे. वकिलाने फक्त एकच एफआयआर योग्य असल्याचे मान्य करण्याबाबत सांगितले, तेव्हा न्यायालयाने सांगितले की, तुम्ही हे प्रकरण उच्च न्यायालयात मांडू शकता. तुम्ही प्रत्येक प्रकरणात ट्रायल कोर्टाकडून जामीन मागू शकता. दिल्लीत नोंदवलेल्या एफआयआरमध्ये काय झाले, कदाचित पोलिसांनी तुमच्यासाठी रेड कार्पेट अंथरले असेल, असे म्हणत न्यायालयाने नुपुर शर्माच्या वकीलांचाही चांगलाच समाचार घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT