राजकीय उलथापालथ सुरु असतानाच महाराष्ट्र पोलिसांचे नुपूर शर्माला समन्स

उत्तर न मिळाल्याने पायधुनी पोलीस ठाण्याने दुसऱ्यांदा नुपूर शर्माला समन्स पाठवले आहे.
Nupur Sharma
Nupur SharmaDainik Gomantak

महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नुपूर शर्माला (Nupur Sharma) पुन्हा समन्स बजावले आहे. मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्यातून भाजपमधून निलंबित करण्यात आलेल्या नुपूर शर्माला दुसऱ्यांदा चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. यापूर्वी 25 जून रोजी त्यांना पायधुनी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडून या नोटीसला उत्तर न मिळाल्याने पायधुनी पोलीस ठाण्याने दुसऱ्यांदा समन्स पाठवले आहे.

Nupur Sharma
Gujarat Riots: समाजसेविका तीस्ता सीतलवाड यांच्यावर ATS मोठी कारवाई

विशेष म्हणजे प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नुपूर शर्मा यांच्याविरोधात ही नोटीस जारी करण्यात आली आहे. एका टीव्ही चॅनलमधील डिबेट शो दरम्यान भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्माने पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. ज्यावर देशातूनच नव्हे तर परदेशातूनही टीका होताना दिसत होती. त्याचवेळी भारतातही हिंसक निदर्शने पाहायला मिळाली.

Nupur Sharma
जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक, सुरक्षा दलांनी 2-3 दहशतवाद्यांना घेरले

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावरून गदारोळ सुरू असताना भाजपने त्यांना निलंबित केले. यानंतर नुपूर शर्माने एक वक्तव्य जारी करत माफी मागितली आहे. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी देशातील अनेक शहरांमध्ये लोक रस्त्यावर उतरले आणि यादरम्यान हिंसाचाराच्या घटना घडल्या. आंदोलक नुपूर शर्माच्या अटकेची मागणी करत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com