Crime News Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh Crime: गुंगीचे औषध देऊन डॉक्टरने महिलेवर केला बलात्कार, फेसबुकवर केली मैत्री; आरोपी...!

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरवर महिलेवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

एका डॉक्टरवर महिलेवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. महिलेला गुंगीचे औषध देऊन डॉक्टरने बलात्कार केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हे संपूर्ण प्रकरण नोएडाच्या सेक्टर 49 पोलीस ठाण्याच्या बरोला परिसरातील आहे.

दरम्यान, सोमवारी एका महिलेने सेक्टर 49 पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली. पीडित महिलेने (Women) तक्रारीत म्हटले आहे की, डॉक्टरने तिला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला.

यानंतर, पोलिसांनी आरोपी डॉक्टरला पकडण्यासाठी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु केला होता.

आरोपीच्या पत्नीने पीडितेला मारहाण केली

त्याचवेळी, निषेध नोंदवल्यावर आरोपीच्या पत्नी आणि मुलीनेही पीडितेला बेदम मारहाण केली. या घटनेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी (Police) मंगळवारी आरोपी डॉ. हरिओम याला अटक केली. विशेष म्हणजे, पोलिसांनी आरोपीची पत्नी आणि मुलीवर यापूर्वीच कारवाई केली आहे.

फेसबुकवर पीडितेशी मैत्री केली

आरोपानुसार, डॉक्टरने पीडितेला गुंगीची गोळी देऊन तिच्यावर बलात्कार केला. डॉक्टरने पीडितेशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री केल्याचा आरोप आहे.

त्यानंतर, मीटिंगसाठी बोलावले आणि नंतर तिला हॉस्पिटलमध्ये चहामध्ये मिसळून काहीतरी दिले. यानंतर, त्याने तिच्यावर बलात्कार केला.

डॉक्टरने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली

दुसरीकडे, आरोपी डॉक्टरने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही बनवला. विरोध केल्यावर पीडित महिलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली होती.

9 जून (शुक्रवारी) पीडितेने आरोपी डॉक्टरविरुद्ध तक्रार दाखल केली. हरिओम कश्यप असे आरोपी डॉक्टरचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो लाईफ लाईन नावाचे रुग्णालय चालवतो.

त्याचबरोबर, या घटनेनंतर बरोलामधील नागरिकांकडूनही रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

या संपूर्ण प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी, असे लोकांचे म्हणणे आहे. आरोपी डॉक्टरने आणखी महिलांसोबत असे जघन्य अपराध केल्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Javier Siverio: 'हमखास गोल नोंदविणारा खेळाडू'! स्पॅनिश हावियर FC Goa टीममध्ये; प्रशिक्षक मार्केझनी केले कौतुक

Goa Third District: 'तिसऱ्या जिल्ह्यात काणकोण नकोच! निर्णय लादल्यास रस्त्यावर उतरणार'; स्थानिक आक्रमक

Atal Patrol Ship: खोल समुद्रात स्वदेशी 'अटल' घालणार गस्त! गोवा शिपयार्डतर्फे 6वे द्रुतगती जहाज; आणखी 12 जहाजांचे जलावतरण होणार

Goa Job Scam: 20 लाख घेतात, अमेरिकेत नोकरीचे आश्वासन देतात; गोव्यातील तरुणांची होतेय फसवणूक, आमोणकरांनी मांडली व्यथा

Goa University: ‘चोरीचा अहवाल फुटला कसा?’ विद्यापीठ शिक्षक संघटनेच्या बैठकीत 4 तास खल

SCROLL FOR NEXT