Court
CourtDainik Gomantak

Uttar Pradesh Crime: लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षकाला कंटाळून मुलींनी शाळेत जाणं बंद केलं, अखेर हायकोर्टात याचिका; 'मास्तराला अटक करा तरच...'

Uttar Pradesh: आग्रा जिल्ह्यातील शमशाबाद ब्लॉकमधील सरकारी प्राथमिक शाळेतील 123 विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी गेल्या काही दिवसांपासून वर्गात जाणे बंद केले आहे.

Uttar Pradesh Crime: आग्रा जिल्ह्यातील शमशाबाद ब्लॉकमधील सरकारी प्राथमिक शाळेतील 123 विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी गेल्या काही दिवसांपासून वर्गात जाणे बंद केले आहे.

दरम्यान, शुक्रवारी त्यांच्यापैकी काही जण त्यांच्या पालकांसह त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी शाळेऐवजी थेट जिल्हा न्यायालयात पोहोचले.

इयत्ता 6-8 मधील किमान 35 विद्यार्थ्यांनी असा दावा केला आहे की, 'त्यांचे शिक्षक त्यांचा विनयभंग आणि शारीरिक शोषण करायचे.' शिक्षकाला अटक झाल्यानंतरच आपण शाळेत परत येणार, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले.

दुसरीकडे, न्यायालयात जबाब नोंदवलेल्या पाच मुलींनी गेल्या दोन वर्षांत शिक्षकाकडून विनयभंग केल्याचा आरोप केला आहे.

सहायक शिक्षक, आशुतोष शर्मा (49) यांच्याविरुद्ध शमशाबाद पोलीस ठाण्यात पॉक्सो कायदा आणि आयपीसी कलम 323, कलम 35 (विनयभंग करण्याच्या उद्देशाने महिलेला जबरदस्ती करणे) आणि 506 (धमकावणे) या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

16 मे रोजी विद्यार्थ्यांच्या (Students) पालकांसह बाल हक्क कार्यकर्ते नरेश पारस यांनी पोलिस आयुक्त प्रीतींदर सिंग यांना या प्रकरणाची माहिती दिली.

Court
Madhya Pradesh Crime: मुस्लिम मुलीशी लग्न केल्याच्या कारणावरुन हिंदू तरुणाची हत्या, खळबळजनक घटनेने उडाला थरकाप!

त्यानंतर, शिक्षण विभागाने या शिक्षकाला निलंबित केले. सध्या हे शिक्षक महाशय फरार आहेत. शाळेत तैनात असलेल्या एका महिला शिक्षिकेने सांगितले की, "आम्ही पोलिस आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे औपचारिक तक्रार केली होती.

परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. तो उघड्यावर लघवी करायचा आणि मुलांना घाबरवण्यासाठी रिव्हॉल्व्हर घेऊन जायचा."

Court
Madhya Pradesh: रामकथेचं आयोजन करणं पडलं महागात, कथावाचकाच्या पट्टशिष्याने पळवली बायको

फतेहाबादाचे एसीपी सौरभ सिंह म्हणाले की, "एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे. सीआरपीसी 164 अंतर्गत न्यायदंडाधिकार्‍यांनी मुलांचे जबाब नोंदवले आहेत. चौकशी सुरु आहे. आरोपी शिक्षकाला लवकरच अटक केली जाईल."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com