Yogi Adityanath Dainik Gomantak
देश

उत्तर प्रदेशात पुन्हा भोंगे लावण्याची हिंमत कुणी करू नये - योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत एक लाख भोंगे उतरवले

दैनिक गोमन्तक

मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आपल्या औरंगाबाद येथील सभेत भोंगे आणि हनुमान चालीसा यामुद्यावरुन उपस्थितांना संबोधित करताना खळबळजनक भाष्य केलं होतं. यावरून महाराष्ट्र पोलीसांनी मनसे आणि हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. अशी पार्श्वभूमी असतानाच उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नियमांचे उल्लंघन करणारे भोंगे उतरवण्याचे आदेश दिले होते. यावरुन उत्तर प्रदेशातील सुमारे एक लाख भोंगे उतरवले आहेत. तसेच पुन्हा भोंगे लावण्याची हिंमत कुणी करू नये. असे ही त्यांनी म्हटले आहे.(No one should dare to install loudspeakers again in Uttar Pradesh)

शनिवारी सायंकाळी झाशी येथे योगी आदित्यनाथ यांनी लोकप्रतिनिधींशी चर्चा केली, विकासकामांचा विभागीय आढावा घेतला. शिवाय काढून टाकलेले लाऊडस्पीकर पुन्हा चालू होणार नाहीत याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. “धार्मिक कार्यक्रम धार्मिक स्थळांच्या आवारातच मर्यादित असावेत, रस्त्यावर कोणताही उत्सव आयोजित करू नये आणि या कार्यक्रमांमुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची काळजी घेतली जावी,” असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले बेकायदेशीर लाऊडस्पीकर हटवण्याची आणि इतर लाऊडस्पीकरचा आवाज विहित मर्यादेपर्यंत मर्यादित करण्याची मोहीम २५ एप्रिलपासून सुरू झाली होती आणि ती १ मेपर्यंत चालली होती. त्यामूळे राज ठाकरे यांनी केलेले भाष्य यावर महाराष्ट्रात आवश्यक अनुकूलता राज्य सरकारने दर्शवली नसली तरी उत्तर प्रदेशमध्ये मात्र याबाबत योगी आदित्यनाथ यांनी तातडीने आदेश जारी करत भोंगे उतरवले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer: महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Sport: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rice Farming Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

Goa Stunt Viral: रिलच्या नादात 'बाहुबली' स्टंट अंगाशी; चालत्या वाहनाच्या छतावर उभे तिघे अचानक कोसळले, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT