देश

'एका रात्रीत कोणी भ्रष्टाचारी होत नाही'; Goa काँग्रेस फुटीवर आसामचे CM Himanta Biswa यांची प्रतिक्रिया

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात आठ काँग्रेस आमदारांनी पक्षाचा हात सोडून भाजपचे कमळ हाती घेतले. काँग्रेस आमदारांच्या प्रवेशामुळे गोव्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आमदारांनी केलेल्या पक्षांतरासाठी काँग्रेसने भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. प्रत्येक आमदाराला पक्षांतरासाठी 30 ते 40 कोटी रूपये दिल्याचा आरोप दिनेश गुंडूराव यांनी केला. काँग्रेस आमदारांच्या बंडावर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. गोव्यातील पक्षांतरामध्ये हिमंत यांचा हात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याबाबत मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, "मला माहित नाही काँग्रेस माझ्यावर का आरोप करत आहे. पण, मी कधीच गोव्याला गेलेलो नाही. आमदारांवर पैसे घेतल्याचा आरोप देखील का केला जात आहे कळत नाही. एका रात्रीत कोणी भ्रष्टाचारी होत नाही. अशा लोकांना काँग्रेसमध्ये का ठेवले होते." असा सवाल देखील हिमंत बिस्वा सरमा यांनी उपस्थित केला.

काँग्रेसचे आमदार त्यांना सोडून जात आहेत आणि पक्ष माझ्यावर आरोप का करत आहे हे कळत नाही. त्यांनी केलेले आरोप मी पूर्णपणे फेटाळतो असे हिमंत सरमा म्हणाले. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर देखील सरमा यांनी टिका करत, भारत कधीच तुटला नव्हता, काँग्रेस केरळ आणि तमिळनाडूतील जनतेचा अपमान करत असल्याचा आरोप सरमा यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ZIM vs NZ: न्यूझीलंडने 67 वर्षांचा विक्रम मोडला, कसोटी इतिहासातील तिसरा सर्वात मोठा विजय नोंदवला

Horoscope: राजराजेश्वर योगाचा शुभ प्रभाव; ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात 'या' 6 राशींना मिळेल यश आणि सन्मान

Redmi Smartphone: आता फोन चार्जिंगचं नो टेन्शन, रेडमी लॉन्च करणार 9000 mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन

Gym Viral Video: ठुकरा के मेरा प्यार... जिममध्ये गाणं वाजताच मुलाचा वर्कआउट मोड ऑन, लोक म्हणाले, 'भाऊचा कमबॅक पक्का'

India's 2nd Biggest Stadium: देशातील दुसरं सर्वात मोठं स्टेडियम उभारलं जाणार; खर्च तब्बल 1650 कोटी, सरकारने केली घोषणा

SCROLL FOR NEXT