Supreme Court Dainik Gomantak
देश

Supreme Court चा मोठा निर्णय, 'कर्नाटकातील ईदगाह मैदानावर गणेशोत्सव होणार नाही'

Ganesh Chaturthi: कर्नाटकची राजधानी बेंगळुरु येथील ईदगाह मैदानावर होणाऱ्या गणेशोत्सवाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.

दैनिक गोमन्तक

Ganesh Chaturthi Celebrations: कर्नाटकची राजधानी बेंगळुरु येथील ईदगाह मैदानावर होणाऱ्या गणेशोत्सवाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. ईदगाह मैदानात गणेशपूजन केले जाणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. यथास्थिती कायम राहील. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवला. यापूर्वी उच्च न्यायालयाने ईदगाह मैदानावर गणेशोत्सवाला परवानगी दिली होती, त्याला मुस्लिम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त ईदगाह मैदानावर यथास्थिती कायम ठेवण्यास सांगितले आहे. सध्या इथे गणेशोत्सव होणार नाही.

दरम्यान, ईदगाह मैदानात गणेश पूजेला परवानगी दिल्यानंतर वाद निर्माण झाला होता. यानंतर मैदानाभोवती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याप्रकरणी राज्याच्या वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु होती.

काय म्हणाले हायकोर्ट?

अलीकडेच, उच्च न्यायालयाने (High Court) राज्य सरकारला बेंगळुरु येथील चामराजपेट ईदगाह मैदानावर गणेशोत्सव साजरा करण्याबाबत विचार करण्यास सांगितले होते. त्यानंतर या मैदानात गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने दोन दिवसांची परवानगीही दिली होती. त्यानंतर वाद निर्माण झाला होता. वक्फ बोर्डाने याला विरोध करत उच्च न्यायालयाच्या या निर्देशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दोन्ही न्यायाधीशांमध्ये मतभेद झाले

हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यावर अंतरिम आदेशाबाबत दोन न्यायमूर्तींमध्ये मतभेद झाले होते. त्यानंतर हे प्रकरण सरन्यायाधीशांकडे पाठवण्यात आले. सीजेआय न्यायमूर्ती यूयू लळित यांनी हे प्रकरण न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी, एमएम सुंदरेश आणि एएस ओका यांच्या खंडपीठाकडे पाठवले. यापूर्वी ईदगाह मैदानावर गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे आताही यथास्थिती कायम राहील, असा निकाल खंडपीठाने दिला आहे.

दुसरीकडे, या मैदानाचा वापर स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी करता येईल, असे उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने यापूर्वी सांगितले होते. याशिवाय खेळाचे मैदान म्हणूनही त्याचा वापर करता येईल. याशिवाय मुस्लिम समाजाचे लोक दोन्ही ईदच्या दिवशी नमाज अदा करु शकतात. नंतर खंडपीठाने आदेशात बदल करुन राज्य सरकारला निर्णय घेण्याची मुभा दिली. यानंतर राज्य सरकारने गणेश चतुर्थीला मान्यता दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amthane Dam Overflow: 'आमठाणे' धरण ओव्हरफ्लोच्या उंबरठ्यावर! 52 मीटरची क्षमता; सध्या 50 मीटर पाणीसाठा

Omkar Elephant: 'ओंकार'चा पुन्हा गोव्यात प्रवेश! मोपा परिसरात सध्या वावर; पिकांवर संकट, वनखात्याची धावपळ

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर ते बेसिक पे... 8वा वेतन आयोग 7व्या आयोगापेक्षा कसा वेगळा? कर्मचाऱ्यांवर परिणाम करणारे 5 मोठे बदल!

Modi Government Political Challenges: राहुल गांधी आणि 'सीजेपी'चे मोदी सरकारपुढे आव्हान

'मिशन 21'! शिंदेंच्या शिवसेनेचा गोव्यात 'एकला चलो रे'चा नारा; महाराष्ट्रात भाजपसोबत युती, मग गोव्यात वेगळा संसार कशासाठी?

SCROLL FOR NEXT