Babri Mosque Case: बाबरी मशीद पाडण्याशी संबंधित सर्व खटले बंद- सर्वोच्च न्यायालय

Babri Mosque Case: सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी 1992 च्या बाबरी मशीद विध्वंसाशी संबंधित सर्व खटले बंद केले.
Babri Mosque Case
Babri Mosque CaseDainik Gomantak
Published on
Updated on

सर्वोच्च न्यायालयाने 6 डिसेंबर 1992 रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील बाबरी मज्जीत पाडण्याशी संबंधित सर्व खटले बंद केले आहेत. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात दाखल केलेली अवमान याचिकाही बंद केली आहे.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने (Supreme Court) म्हटले की, याचिकाकर्ते अस्लम भुरे आता या जगात नाहीत. तसेच 2019 मध्ये झालेल्या निर्णयामुळे आता ही बाब कायम ठेवण्याची गरज नाही.

बाबरी मशीद विध्वंस
6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशीद पाडण्यात आली. सोळाव्या शतकात अयोध्येत बांधलेली मशीद कारसेवकांनी पाडली होती. फैजाबादमध्ये या प्रकरणी दोन एफआयआर (FIR) दाखल करण्यात आले होते.

Babri Mosque Case
आसाम पोलिसांनी ट्रकमधून 4,728 किलो गांजा जप्त

भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, उमा भारती यांच्यासह लाखो कारसेवकांवर गुन्हा दाखल होता. त्यामुळे देशभरात तणावाचे वातावरण पसरले होते. देशभरात झालेल्या दंगलीत दोन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com