Nitish Kumar On PK: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी घरी बोलावले होते आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) पक्षाचे उत्तराधिकारी व्हा, अशी ऑफर दिली होती, असे नुकतेच निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सांगितले होते. त्याविषय़ी बोलताना, नितीशकुमार यांनी, प्रशांत किशोर यांना आमचा जनता दल युनायटेड पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करायचा होता, असा पलटवार केला आहे.
या पत्रकार परिषदेवेळी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव देखील उपस्थित होते. नितीशकुमार म्हणाले की, प्रशांत किशोर यांचा दावा खोटा आहे. मी त्यांना कोणतीही ऑफऱ दिलेले नाही. ते असेच बोलत आहेत त्यात काही तथ्य नाही. त्यांना जे काही बोलायचे आहे ते बोलू द्या, आम्हाला त्यांच्याशी काही देणे घेणे नाही. त्यांच्यावर रोजरोज काय बोलायचे?
नितीशकुमार म्हणाले, प्रशांत किशोर माझ्यासोबत होते, मी त्यांच्याबद्दल काय सांगू? ही साधारण 4-5 वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. ते माझ्या घरी राहत होते. एकेदिवशी ते मला म्हणाले की, आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करून टाका. मी त्यांना उलट विचारले की, आम्ही का आमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करावा?
खरेतर, या अशा विचारांमुळेच ते कुठेही स्थिर राहिलेले नाहीत. आम्ही त्यांना आमच्या पक्षात बोलावले नव्हते. ते स्वतःचा आमच्या भेटीसाठी आले होते. आणि आमच्यात जे बोलणे झाले होते, त्याविषय़ी मी काही बोलणार नाही. त्यांना जे काही बोलायचे आहे ते त्यांना बोलू द्या.
पीके भाजपसाठी काम करत आहेत...
नितीशकुमार म्हणाले की, प्रशांत किशोर सध्या राजद आणि जेडीयू विरोधात काम करत आहेत. म्हणजेच एकप्रकारे सध्या ते भाजपसाठीच काम करत आहेत.
५ ऑक्टोबर रोजी जनसुराज्य यात्रेदरम्यान, प्रशांत किशोर यांनी दावा केला होता की, नितिशकुमार यांनी त्यांना घरी बोलावले होते आणि ते मला म्हणाले की, मी त्यांचा उत्तराधिकारी, मी हे सर्व का करत आहे? आमच्या पक्षाचे नेते व्हा. त्यांना भेटायला जाण्यावरून अनेकांनी मला नावे ठेवली.
पण, मी नितीशकुमार यांना भेटलो कारण मला त्यांना हे दाखवून द्यायचे होते की, त्यांनी मला कितीही मोठी प्रलोभने दाखवली तरी मी जनतेला दिलेल्या आश्वासनांपासून मागे हटणार नाही. मग भलेही ते मला उत्तराधिकारी बनवू देत किंवा त्यांनी स्वतःची खुर्ची सोडली तरही त्याला काहीही अर्थ नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.