Heroin Seized In Gujrat: गुजरात किनाऱ्यावर पाकिस्तानी बोटीतून 350 कोटींचे हेरॉईन जप्त

कच्छमध्ये एटीएससह भारतीय तटरक्षक दलाची कारवाई; 6 पाकिस्तानी नागरीकांना अटक
Cannabis
Cannabis Dainik Gomantak
Published on
Updated on

Heroin Seized In Gujrat: गुजरातमधील कच्छच्या किनाऱ्यावर एक पाकिस्तानी बोट जप्त करण्यात आली असून या बोटीतून 50 किलो हेरॉईन सापडले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनची किंमत सुमारे 350 कोटी रूपये इतकी आहे. अल सकर असे या बोटीचे नाव आहे.

Cannabis
Centre Writes to CJI: उत्तराधिकारी नेमण्याची प्रक्रिया सुरू करा! केंद्र सरकारचे सरन्यायाधीशांना पत्र

एटीएस (ATS) आणि भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) हे संयुक्त अभियान राबवले. बोटीतील सहा पाकिस्तानी नागरिकांनाही अटक करण्यात आली आहे. गुजरातच्या किनाऱ्यावर समुद्रात इंटरनॅशनल मेरीटाईम बाऊंड्री लाईनजवळ या बोटीला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासासाठी या पाकिस्तानी नागरिकांसह बोट सध्या जखाऊ बंदरात आणली गेली आहे.

पाकिस्तानकडून भारतात अमली पदार्थाच्या रॅकेटला सातत्याने खतपाणी घातले जात असल्याचे वारंवार समोर आले आहे. सीमेपलीकडून भारतात अमली पदार्थांची तस्करी केली जाते. अशा तस्करींचे पाकिस्तानचे अनेक प्रयत्न भारतीय तपास यंत्रणांच्या सतर्कतेने गेल्या काही काळात अपयशी ठरले आहेत.

Cannabis
Reservation: मुस्लीम, ख्रिश्चन धर्म स्विकारलेल्या दलितांना आरक्षण मिळणार की नाही?

यापुर्वी 14 सप्टेंबर रोज गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने भारतीय तटरक्षक दलासोबत केलेल्या संयुक्त कारवाईत अरबी समुद्रात एक मासेमारी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेतून 40 किलो हेरॉईन जप्त केले गेले होते. त्याची किंम २०० कोटी रूपये होती. हे हेरॉईन गुजरातमध्ये उतरून रस्तेमार्गाने पंजाबात नेले जाणार होते.

दरम्यान, गतवर्षी सप्टेंबरमध्ये गुजरातमधील मुंद्रा या उद्योगपती गौतम अदानी यांच्या मालकीच्या बंदरावरून तब्बल 3 हजार किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. या अमली पदार्थांची किंमत जवळपास 9 हजार कोटी रूपये इतकी होती. गुजरातच्या महसूल गुप्तचर संचलनालयाने ही कारवाई केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com