Facebook Users Data leak: तुम्ही फेसबुकचा पासवर्ड बदलला की नाही?

दहा लाख युजर्सचा डाटा झाला लीक; मार्क झकरबर्गला या आधीही झालाय मोठा दंड
Facebook Data Leak
Facebook Data LeakDainik Gomantak
Published on
Updated on

Facebook Users Data leak: फेसबुक युजर्सच्या डेटा चोरीचा प्रकार पुन्हा समोर आला आहे. जवळपास 10 लाख फेसबूक युजर्सचा डेटा लीक झाला असून कंपनीने युजर्सना तत्काळ पासवर्ड बदलण्यास सांगितले आहे.

Facebook Data Leak
Putin And Zelensky: पुतिन-झेलेन्स्की येणार एकाच मंचावर?

गेल्या काही वर्षांमध्ये फेसबूकचा डेटा लीक होण्याचे अनेक प्रकार अनेकदा घडले आहे. त्यामुळे युजर्सच्या माहितीच्या प्रायव्हसीबाबतही अनेक प्रश्न उभे राहिले होते. त्यातच जवळपास 10 लाख युजर्सचा खासगी डेटा त्यांच्या पासवर्डसह लीक झाला आहे. थर्ड पार्टी अॅप्सद्वारे हा डेटा लीक झाल्याची माहिती आहे.

कंपनीचे अधिकारी डेव्हिड एग्रानोव्हिच यांनी म्हटले आहे की, अॅपल किंवा अँड्रॉईडसाठी अॅप तयार करून त्याद्वारे डेटा चोरी करणाऱ्या 400 हून अधिक अॅप्सची ओळख या एका वर्षात कंपनीने केली आहे. ही अॅप्स अगदी सहजरित्या गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपलच्या अॅप स्टोअऱवल वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे कंपनीने युजर्सना तत्काळ पासवर्ड बदलण्याचा सल्ला दिला आहे.

Facebook Data Leak
Nobel Peace Prize 2022: यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार एका व्यक्तीसह दोन संघटनांना जाहीर

मेटा कंपनीने एका ब्लॉग मध्ये म्हटले आहे की, ही अॅप्स गुगल प्ले स्टोअर आणि अॅपलच्या अॅप स्टोअरवर लिस्टेड होती. त्यात फोटो एडिटर, व्हीपीए सर्व्हिस अशा अॅप्सचा समावेश आहे. मेटाच्या संरक्षण विभागाच्या मते, ही अॅप्स लोकांना सतत अॅप वापराच्या बदल्यात युजसर्च्या नाव आणि पासवर्डची चोरी करण्यासाठी फेसबूक अकाऊंटवर लॉगिन करण्यास भाग पाडत होती.

या पुर्वी 2018 मध्ये कोट्यवधी फेसबूक युजर्सच्या डेटा लीकप्रकरणी 2019 मध्ये फेसबूकवर फेडरल ट्रेड कमिशनने 5 अब्ज डॉलरचा दंड केला होता. 2018 मध्ये कॅम्ब्रिज अॅनालिटिकाचे प्रकरण समोर आले होते.

लंडनच्या या फर्मकडे 2015 पासून फेसबूक युजर्सचा डेटा होता आणि त्याचा वापर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत केला गेला होता. या लाखो फेसबुक युजर्सच्या माहितीच्या वापर करूनच अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदावर आरूढ झाले होते. त्यावरून फेसबुकचे सीईओ मार्क झकरबर्ग याच्यावर खटलाही दाखल केला गेला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com