Navjot Singh Sidhu and Bhagwant Mann Dainik Gomantak
देश

पंजाबमध्ये मागील 21 दिवसांत 19 जणांची हत्या; विरोधी पक्ष आक्रमक

पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे: नवज्योत सिंग सिद्धू

दैनिक गोमन्तक

पंजाबमध्ये पहिल्यांदाच सत्ता हाती घेतलेल्या आम आदमी पक्षाला (आप) राज्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे विरोधी पक्षांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. मागील 21 दिवसांत येथे 19 जणांची हत्या झाली आहे. यामध्ये जालंधरजवळ आंतरराष्ट्रीय खेळाडू संदीप सिंग संधूसह कबड्डीपटूंच्या तीन हत्यांचा समावेश आहे. (nineteen murders in twenty one days in Punjab)

पंजाब काँग्रेसचे (Congress) माजी प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले, "पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, तर मुख्यमंत्री हिमाचलच्या थंड हवेत मते मागण्यात व्यस्त आहेत. दररोज सरासरी तीन ते चार हत्या होत आहेत. लोक घाबरले आहेत."

दुसरीकडे शिरोमणी अकाली दलाचे नेते डॉ.दलजीत सिंग चीमा म्हणाले की, पंजाबमध्ये (Punjab) आप सरकार स्थापन झाल्यापासून लोकांना असुरक्षित वाटत आहे. आप सरकारचा पर्दाफाश झाला आहे. प्रचारात व्यस्त न राहता वाढत्या गुन्हेगारीवर तातडीने नियंत्रण ठेवावे, असे आवाहन आम्ही मुख्यमंत्री भगवंत मान यांना करतो.

21 दिवसांत घडल्या या घटना
14 मार्च रोजी जालंधरजवळ आंतरराष्ट्रीय खेळाडू संदीप सिंह संधू उर्फ ​​संदीप नांगल अंबियाची हत्या करण्यात आली होती. मोगाच्या मार्ही मुस्तफा गावात 2 एप्रिलला गँगस्टर हरजित सिंग उर्फ ​​पिंटाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. लुधियानाच्या स्वतंत्र नगरमध्ये एका काँग्रेस कार्यकर्त्याची अकाली दलाच्या तीन कार्यकर्त्यांनी हत्या केली. गुरुदासपूरच्या पुहला गावात पोलिसांच्या उपस्थितीत बदमाशांनी गोळीबार करून तिघांची हत्या केली. पटियालामध्ये 5 एप्रिल रोजी अज्ञात हल्लेखोरांनी कबड्डी क्लबचे अध्यक्ष धर्मिंदर सिंग यांची गोळ्या घालून हत्या केली होती. तरनतारनच्या गजल गावात झालेल्या गोळीबारात व्हॉलीबॉल खेळाडू जखमी झाला. अँटी गँगस्टर टास्क फोर्स स्थापन करणार राज्यातील वाढत्या हत्यांनंतर कारवाईत आलेल्या पंजाब सरकारने अँटी गँगस्टर टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली आहे. हे दल संघटित गुन्हेगारी नियंत्रण युनिटमध्ये सुधारणा करेल. 'आप'चे प्रवक्ते मलविंदर सिंग कांग यांच्या म्हणण्यानुसार, टास्क फोर्सचे नेतृत्व एडीजीपी दर्जाचे अधिकारी करतील.

राजकीय संरक्षणाशिवाय टोळ्यांचा विकास होऊ शकत नाही
वरिष्ठ पोलीस (Police) अधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगतात की, राजकीय आश्रयाशिवाय टोळ्या टिकू शकत नाहीत. काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलासह राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर गुंडांशी संबंध असल्याचा आरोप करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT