दिल्लीत एप्रिलच्या कडक उष्णतेने मोडला 72 वर्षांचा विक्रम

दिल्लीत (Delhi) एप्रिलच्या सुरुवातीलाच तापमानाने उग्र रुप धारण केले आहे.
 Temperatures
TemperaturesDainik Gomantak
Published on
Updated on

दिल्लीत एप्रिलच्या सुरुवातीलाच तापमानाने उग्र रूप धारण केले आहे. राजधानीत शनिवारी 42.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, ज्याने एप्रिलमधील कमाल तापमानाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला. मात्र, एप्रिलच्या सुरुवातीच्या दिवसात दिल्लीतील (Delhi) उष्णतेने 72 वर्षांचा विक्रम मोडला आहे. भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) शनिवारी ही माहिती दिली. रविवारी दिल्लीत उष्णतेच्या लाटेचा इशारा देत हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये उष्णतेची तीव्र लाट सुरु आहे. शनिवारी तापमान 42 अंशांच्या पुढे गेले आहे. तर गुरुग्रामच्या काही भागात पारा 45 अंशांच्या जवळ पोहोचला आहे. (The 72-year-old record was broken by the scorching heat of April in Delhi)

 Temperatures
एप्रिलमध्येच वाढणार भारतात तापमान, पुढील 5 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता

दरम्यान, याआधी एप्रिलमध्ये दिल्लीत सर्वाधिक तापमानाचा विक्रम 21 एप्रिल 2017 रोजी 43.2 डिग्री सेल्सियस नोंदवला गेला होता. तथापि, दिल्लीमध्ये एप्रिलमध्ये सर्वाधिक उष्णतेचा विक्रम 29 एप्रिल 1941 रोजी झाला, जेव्हा तापमान 45.6 डिग्री सेल्सियस नोंदवले गेले. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, एप्रिलच्या पहिल्या 15 दिवसांत एवढी उष्णता जाणवत असताना 72 वर्षांतील ही पहिलीच घटना आहे.

 Temperatures
देशात उष्णतेची लाट, 40 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान

तसेच, रविवारी तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आल्याने, तातडीचे काम असेल तरच लोकांनी घराबाहेर पडावे, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. विभाग ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करतोय. रेड अलर्ट ही सर्वात धोकादायक चेतावणी आहे. तर ग्रीन अलर्ट हवामान सौम्य असल्याचे दर्शवते. दिल्लीच्या सफदरजंग वेधशाळा बेस स्टेशनवर 9 एप्रिल रोजी 42.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. हे यंदाच्या सामान्य तापमानापेक्षा 8 अंशांनी अधिक आहे. गुरुग्राममध्येही तापमान 44.5 अंश सेल्सिअसवर पोहोचले असून ते सरासरीपेक्षा 10 अंशांनी जास्त आहे. 28 एप्रिल 1979 रोजी गुरुग्राममध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान 44.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com