NIA  Dainik Gomantak
देश

NIA Action: कोईम्बतूर अन् मंगळुरु बॉम्बस्फोटांप्रकरणी NIA ची तामिळनाडू, केरळमध्ये छापेमारी

कोईम्बतूर आणि मंगळुरु येथील बॉम्बस्फोटांच्या दोन प्रकरणांसंदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) बुधवारी तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमध्ये छापे टाकले.

Manish Jadhav

NIA Action: कोईम्बतूर आणि मंगळुरु येथील बॉम्बस्फोटांच्या दोन प्रकरणांसंदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) बुधवारी तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमध्ये छापे टाकले.

ही माहिती देताना एनआयएच्या अधिकृत प्रवक्त्याने सांगितले की, 40 ठिकाणी छापे टाकण्यात आले, त्यापैकी 32 कोईम्बतूर कार बॉम्बस्फोटांशी संबंधित आहेत, तर 8 मंगळुरु बॉम्बस्फोटांशी संबंधित आहेत. यापैकी एक प्रकरण तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील कोट्टई इसवरन मंदिरासमोर स्फोटके वाहून नेणाऱ्या कारच्या स्फोटाशी संबंधित आहे.

आरोपी जमेशा मुबीनला मंदिर उडवायचे होते

एजन्सीच्या प्रवक्त्याने सांगितले की, आरोपी जेमशा मुबीनने गेल्या वर्षी 23 ऑक्टोबर रोजी ISISशी निष्ठेची शपथ घेतल्यानंतर आत्मघाती हल्ला करुन मंदिर परिसराचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याची योजना आखली होती. दहशत पसरवणे हा त्यांचा उद्देश असल्याचे प्रवक्त्याने सांगितले. दुसरे प्रकरण मंगळुरु शहरातील बॉम्बस्फोटाशी संबंधित आहे.

कोईम्बतूर प्रकरणात 32 ठिकाणी छापे टाकण्यात आले

या छाप्यात मोठ्या प्रमाणात डिजिटल उपकरणे आणि 4 लाख रुपये रोख जप्त करण्यात आल्याचे प्रवक्त्याने सांगितले. या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

तामिळनाडू आणि केरळमधील (Kerala) कोईम्बतूर प्रकरणाशी संबंधित छापे, कोईम्बतूर (14), त्रिची (1), निलगिरी (2), तिरुनेलवेली (3), तुतीकोरीन (1), चेन्नई (3), तिरुवन्नमलाई (2), दिंडीगुल (1) , मयिलादुथुराई (1), कृष्णगिरी (1), कन्याकुमारी (1), तेनकासी (1) आणि एर्नाकुलम (1) यासह 32 ठिकाणी आयोजित केले गेले. एजन्सीने मंगळुरु प्रकरणासंदर्भात तामिळनाडूमधील (Tamil Nadu) तिरुपूर (2) आणि कोईम्बतूर (1), केरळमधील एर्नाकुलम (4) आणि कर्नाटकातील म्हैसूर (1) 8 ठिकाणी शोध घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT