NIA : NIA ची दिल्लीसह चार राज्यांमध्ये छापेमारी; आयएसआय आणि गँगस्टर्सच्या संबंधांची माहिती उघड

भारत आणि परदेशातील दहशतवादी, गुंड आणि अंमली पदार्थांचे तस्कर यांच्यातील वाढत्या संबंधाचा पर्दाफाश करण्याच्या उद्देशाने, एनआयएने छापे टाकले.
NIA
NIA Dainik Gomantak
Published on
Updated on

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मंगळवारी सकाळी दिल्ली, पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि यूपीमध्ये गुंडाच्या ठिकाणी छापे टाकले आहेत. भारतात आणि परदेशातील दहशतवादी, गुंड आणि अंमली पदार्थांचे तस्कर यांच्यातील वाढत्या संबंधाचा पर्दाफाश करण्याच्या उद्देशाने, एनआयएने दिल्लीसह चार राज्यांतील सहाहून अधिक जिल्ह्यांमध्ये छापे टाकले.

तसेच एनआयएने आतापर्यंत अटक केलेल्या सर्व गँगस्टर्सच्या चौकशीच्या आधारे पाकिस्तान-आयएसआय आणि गँगस्टर्सच्या संबंधांची माहिती जमा केली आहे. देशविरोधी कारवायांसाठी या गँगस्टर्सचा कशाप्रकारे वापर केला जात आहे, याची माहिती तपास यंत्रणा जमा करत आहे. या छाप्यांमध्ये लॉरेन्स बिश्नोई, नीरज बवाना, टिल्लू ताजपुरिया आणि गोल्डी ब्रार यांचा समावेश असलेल्या टोळ्या एनआयएच्या रडारवर आहेत. यापूर्वी एनआयएने 52 ठिकाणी छापे टाकले ऑक्टोबरमध्ये एनआयएने उत्तर भारतातील चार राज्ये आणि दिल्लीसह 52 ठिकाणी छापे टाकले होते.

NIA
Cyber Crime: व्हॉट्सअप युजर्सकरिता चिंताजनक बातमी

या छापेमारीत ईशान्य दिल्लीतून एका वकिलाला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या वकिलाचे नाव आसिफ खान असून तो ईशान्य दिल्लीतील उस्मानपूर भागातील गौतम विहार येथील रहिवासी आहे. एजन्सीच्या गुप्तहेरांनी त्याच्या निवासस्थानी झडती घेतलीय. दरम्यान त्याच्या घरातून चार शस्त्रे आणि काही पिस्तूलांसह दारूगोळा जप्त केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

NIA
Sheikh Rashid Video: इम्रान खान यांच्या रॅलीने ट्रॅफिक जाम, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले...

आसिफ तुरुंगात असलेल्या गुंडांच्या संपर्कात असल्याचे एनआयएने चौकशीदरम्यान उघड केले. एनआयएने राजेश उर्फ ​​राजू मोटा, रहिवासी बसौडी, सोनीपत (हरियाणा) यालाही अटक केली. एनआयएच्या म्हणण्यानुसार मोटा यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. सप्टेंबरमध्ये एनआयएने पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्ली तसेच राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) 52 ठिकाणी छापे टाकले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com