इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप लवकरच त्याच्या वापरकर्त्यांसाठी नवीन अपडेट घेऊन येत करणार आहे.  Dainik Gomantak
देश

WhatsApp यूजर्ससाठी लवकरच आणणार नवीन 'स्टेटस अपडेट'

जर वापरकर्त्याने अपडेट केल्यानंतर त्याचे स्टेटस अपलोड केले, तर त्याच्या प्रोफाईल फोटोवर हिरव्या रंगाची एक अंगठी सारखे चित्र दिसेल, जी वापरकर्त्याने स्टेटस अपलोड केल्याचे दर्शवेल.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप (WhatsApp) लवकरच त्याच्या वापरकर्त्यांसाठी नवीन अपडेट घेऊन येत करणार आहे. हे अपडेट आल्यानंतर, व्हॉट्सॲप यूजर्स आपले स्टेटस एडिट (WhatsApp users edit your status) करून त्यामध्ये स्टेटस अधिक तयार करू शकतील. या व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना त्यांच्याशी संबंधित लोकांच्या प्रोफाइल फोटोवर एक हिरव्या रंगाचे अंगठी सारखे सिम्बॉल दिसेल. हे असे सूचित करेल की त्या लोकांनी स्टेटस अपलोड केले आहे. मात्र या अपडेटबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

वेब बीटाने दिलेल्या माहितीनुसार, जर वापरकर्त्याने अपडेट केल्यानंतर त्याचे स्टेटस अपलोड केले, तर त्याच्या प्रोफाईल फोटोवर हिरव्या रंगाची एक अंगठी सारखे चित्र दिसेल, जी वापरकर्त्याने स्टेटस अपलोड केल्याचे दर्शवेल. इतर वापरकर्ते त्याच्या प्रोफाइलवर क्लिक करताच त्यांना त्याची स्थिती दिसेल. हे वैशिष्ट्य इंस्टाग्राम आणि ट्विटर फ्लीट प्रमाणे काम करेल. स्टेटस फीचर 2017 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे स्नॅपचॅट प्रमाणे काम करते. या वैशिष्ट्याअंतर्गत शेअर केलेले फोटो, व्हिडिओ आणि कोट्स 24 तासांसाठी आपोआप गायब होतात.

चॅटिंगच्या नव्या फीचरची चाचणी सुरू

व्हॉट्सॲप चॅटिंगला मजेदार बनवण्यासाठी एका खास फीचरवर काम करत आहे. ज्याला ‘स्टिकर सजेशन असे नाव देण्यात आले आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे, वापरकर्त्यांनी टाईप केलेल्या शब्दानुसार त्यालाअनुसरुन स्टिकर्स मिळू शकतात. याबाबत एका अहवालात म्हटले आहे की, संदेश टाईप करताना वापरकर्त्यांना स्टिकर सूचना मिळेल. याची सध्या चाचणी सुरु असून ते लवकरच Android-IOS वापरकर्त्यांसाठी जारी करण्यात येईल.

व्हॉट्सॲपने मार्चमध्ये म्यूट व्हिडीओज नावाचे फिचर लाँच केले. या फीचरची खासियत म्हणजे वापरकर्ते व्हिडिओ पाठवण्यापूर्वी त्याचा आवाज बंद करू शकतात. म्हणजेच, जेव्हा इतर वापरकर्त्यांना तो व्हिडिओ मिळेल, तेव्हा त्यात आवाज येणार नाही. या फीचरचा वापरकर्त्यांना खूप उपयोग होईल, असा कंपनीला विश्वास आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

Goa Fraud: PMO मध्ये सिक्युरिटी इन्चार्ज असल्याचं भासवून टॅक्सीचालकांना गंडा; तोतया व्यक्तीविरोधात तक्रार दाखल!

Calangute: बीचवरुन बेपत्ता झाला 9 वर्षाचा परदेशी पर्यटक, गोवा पोलिसांनी पुन्हा घडवली कझाकस्तानच्या मायलेकांची भेट

Goa Today's Live News: पंतप्रधानांचा सुरक्षा प्रभारी असल्याची तोतयागिरी केल्याप्रकरणी शिरंग जावळ विरोधात तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT