काय आहे WhatsApp चे नविन ‘View Once’ फिचर्स?

व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्या सर्वांसाठी न दिसणारे फोटो आणि व्हिडिओसाठी नवीन ‘View Once’ फिचर्स आणत आहे.
WhatsApp's View Once feature
WhatsApp's View Once featureDainik Gomantak

प्रतिस्पर्ध्यांच्या पुढे राहण्याच्या सतत प्रयत्नात असेलले व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) नेहमीच आपल्या अ‍ॅपमध्ये काही तरी नवीन बदल करत असतात. व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरकर्त्यांना (Users) पुरवल्या जाणाऱ्या अतिशय उपयुक्त चॅट फिचर्समध्ये(Chat features) ही काही बदल करण्यात आले आहे. हे नवीन व्हॉट्सअ‍ॅप चॅटचे फिचर्स नवीन इंप्रुव्हमेंट करू शकते, युजर्स इंटरफेसमध्ये बदल करू शकतो किंवा युजर्सच्या प्रायव्हसीमध्ये आणखी इंप्रुव्हमेंट (improve user privacy) आणू शकते. गेल्या महिन्यात, व्हॉट्सअ‍ॅपने मर्यादित संख्येने बीटा (Beta) वापरकर्त्यांसाठी त्याच्या आगामी मल्टी-डिव्हाइस फिचर्सची चाचणी सुरू केली, त्याचबरोबर एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड बॅकअपची थोड्या काळासाठी चाचणी देखील करण्यात आली आहे. आता, व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्या सर्वांसाठी न दिसणारे फोटो आणि व्हिडिओसाठी नवीन ‘View Once’ फिचर्स आणत आहे. (WhatsApp's View Once feature: Here's how you can use it)

व्हॉट्सअ‍ॅप ‘View Once' फीचरचे फायदे:

व्हॉट्सअ‍ॅप आयओएस आणि अँड्रॉइड दोन्हीवर इमेजसाठी नवीन View Once ची चाचणी करत आहे. मंगळवारी एका ब्लॉग पोस्टमध्ये फेसबुकने नवीन फिचर्समागील कारण स्पष्ट केले. विशिष्ट कालावधीनंतर आपोआप व्हॉट्सअ‍ॅपकडून येणाऱ्या नोटिफिकेशनमधून सुटका होणार आहे. 14 दिवसानंतर आपल्या फोनमधून फोटो आणि व्हिडिओ आपोआप डिलीट होणार आहे. युजर्सच्या प्रायव्हसीबद्दल कंपनीने काही नविन फिचर्स अ‍ॅड करत असताना, आपला फोन निटनेटका ठेवण्याची सोय या फिचर्सच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

WhatsApp's View Once feature
COVID-19: केरळ तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर

मोबाईल फोन अधिक स्मार्ट झाल्यामुळे फोटो आणि व्हिडिओ घेणे अधिक सोपे झाले आहे, कंपनी म्हणते की, हे फोटो किंवा व्हिडोओ तुमच्या फोनमध्ये आल्यामुळे नंतर तुम्हाला स्टोरेजची समस्या उद्भवू शकते, ज्यामध्ये तुम्हाला शेकडो किंवा हजारो फोटो आणि व्हिडीओ चेक करून डिलीट करावे लागतात. किंवा ते बाजारातील एखाद्या निरूपद्रवी वस्तूसारखे काढून टाकावे लागतात.

व्हॉट्सअ‍ॅप ‘View Once कसे कार्य करते

व्हॉट्सअ‍ॅपवर, जर तुम्ही न दिसणारा SMS पाठवला तर तुम्हाला मीडियावर जावून 'View Once ' हे चिन्ह दिसेल. जेव्हा तुम्ही फोटो मीडिया मध्ये बघायला जाल तर दिसणार नाही मात्र ‘View Once क्लिक केल्यानंतर ते फोनमध्ये बघू शकणार. जसे स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजर च्या माध्यमातून मिडीया गॅलरी पाहिल्यानंतर चॅटमध्ये असणारे महत्वाचे SMS आणि फोटो बघतांना आपला गोंघळ होणार नाही.

WhatsApp's View Once feature
EDची मोठी कारवाई, देशातील बड्या उद्योजकाला बेड्या

व्हॉट्सअ‍ॅपवर कोणाला एकदा व्ह्यू वन फोटो किंवा व्हिडिओ पाठवण्यासाठी, तुम्ही अॅपचा कॅमेरा वापरून फोटो किंवा व्हिडीओ पटकन क्लिक करू शकता आणि नंतर View Once वर टॅप करू शकता जे नंतर तुम्ही फक्त View Once माध्यम म्हणून कॅप्चर केलेले मीडिया पाठवू शकणार. आणि एकदा आपण ते पाठविल्यानंतर, तो फोटो एकदाच ओपन करू शकणार एकदा टॅप केल्यानंतर ज्याला आपण SMS सेंड केला असेल तो फक्त एकदाच पाहू शकणार.

व्हॉट्सअ‍ॅप 'View Once' फीचर कधी सुरू होईल?

व्हॉट्सअ‍ॅप म्हणते की हे फिचर्स या आठवड्यातच सर्व वापरकर्त्यांसाठी येत आहे - म्हणून, जर आपल्याला ते अद्याप प्राप्त झाले नसेल तर ते आपल्या डिव्हाइसवर रोलआउट होण्यापर्यंत वेळ लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com