Rules Changes from 1 January 2026 Dainik Gomantak
देश

2026 New Rules: गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून लागू झाले 'हे' 8 नवे नियम! सामान्यांच्या खिशाला कात्री

Rules Changes from 1 January 2026: नवीन वर्षाचे आगमन झाले असून केवळ कॅलेंडरच नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक आर्थिक आणि प्रशासकीय नियमही बदलले आहेत.

Sameer Amunekar

नवीन वर्षाचे आगमन झाले असून केवळ कॅलेंडरच नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक आर्थिक आणि प्रशासकीय नियमही बदलले आहेत. १ जानेवारी २०२६ पासून गॅस सिलिंडरच्या किमती, रेल्वे बुकिंग आणि बँकिंग क्षेत्रातील एकूण ८ महत्त्वाचे नियम लागू झाले आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि बचतीवर होणार आहे. काही ठिकाणी सरकारने दिलासा दिला असला, तर काही ठिकाणी महागाईचा चटका सहन करावा लागणार आहे.

गॅस महागला पण...

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक (Commercial) गॅस सिलिंडरच्या किमतीत १११ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. यामुळे हॉटेलिंग आणि बाहेरील खाद्यपदार्थ महाग होण्याची शक्यता आहे. मात्र, घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरचे दर स्थिर ठेवण्यात आल्याने गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, दिल्ली-एनसीआरमधील पाइप नॅचरल गॅस (PNG) वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण आयजीएलने पीएनजीच्या दरात ७० पैशांची कपात केली आहे.

बँकिंग आणि क्रेडिट स्कोरमध्ये बदल

आर्थिक शिस्त लावण्यासाठी आजपासून 'क्रेडिट स्कोर' अपडेट होण्याच्या कालावधीत बदल झाला आहे. आता तुमचा सिबिल किंवा क्रेडिट स्कोर १५ दिवसांऐवजी दर आठवड्याला अपडेट केला जाईल. याचा अर्थ असा की, तुम्ही कर्जाचा हप्ता वेळेवर भरल्यास त्याचा फायदा लगेच दिसेल, पण हप्ता थकवल्यास त्याचे परिणामही त्वरित क्रेडिट रिपोर्टवर उमटतील. तसेच, ज्यांनी पॅन-आधार लिंक केलेले नाही, त्यांचे पॅन कार्ड आजपासून निष्क्रिय (Inactive) होणार असल्याने मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये अडचणी येऊ शकतात.

रेल्वे तिकीट बुकिंग आणि युपीआय सुरक्षा

रेल्वेने आपल्या तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी 'आधार ऑथेंटिकेशन' अनिवार्य करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. ५ जानेवारीपासून आधार व्हेरिफाईड युजर्सना तिकीट बुकिंगमध्ये प्राधान्य मिळणार आहे. डिजिटल व्यवहारांबाबत बोलायचे झाले तर, युपीआय (UPI) पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी सिम व्हेरिफिकेशन आणि नवीन सुरक्षा मानके लागू करण्यात आली आहेत. यामुळे सायबर फसवणुकीच्या घटनांना लगाम बसेल, अशी अपेक्षा आहे.

वेतन आयोग आणि करदात्यांसाठी सूचना

सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी ८ व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या चर्चांना आजपासून अधिकृतपणे वेग आला आहे. जरी वेतन वाढीसाठी काही काळ वाट पाहावी लागणार असली, तरी त्याची गणना आजपासून सुरू झाल्याचे मानले जात आहे. याव्यतिरिक्त, ज्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत सुधारित आयटीआर (Revised ITR) भरलेला नाही, त्यांना आता दंड भरून अपडेटेड रिटर्न फाईल करावा लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa GI Tag: गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 5 नवीन उत्पादनांना मिळाले 'GI' मानांक; कृषी समृद्धीचा जागतिक गौरव

Pillion Helmet Rule: आता मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती, रस्ते सुरक्षेसाठी मोठा निर्णय! टप्प्याटप्प्याने होणार अंमलबजावणी

Goa Sealed Club: सील केलेले क्लब पुन्हा सुरू झाल्याने संशय, प्रशासकीय सावळागोंधळ की मिलीभगत? 'अग्निसुरक्षे'चे नियम धाब्यावर

Goa Live News: कळंगुटमध्ये हाणामारीत वृद्धाचा मृत्यू; संशयित पोलिसांच्या ताब्यात

वर्षाचा शेवटचा दिवस आयुष्याचाही शेवटचा ठरला; गोव्याच्या समुद्रात बिहारचा एक पर्यटक बुडाला, दुसरा जखमी

SCROLL FOR NEXT