Nepal's Kami Rita Sherpa
Nepal's Kami Rita Sherpa Dainik Gomantak
देश

Mount Everest: नेपाळच्या कामी रीताने केला नवा विश्वविक्रम, 27 व्यांदा सर केला एव्हरेस्ट

दैनिक गोमन्तक

Nepal's Kami Rita Sherpa:  माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर आहे. एके दिवशी त्यावर चढाई करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण कोणी किती वेळा चढेल? एकदा, दोनदा पण नेपाळच्या एका शेर्पाने 27व्यांदा एव्हरेस्ट सर करुन आपलाच पूर्वीचा विक्रम मोडला आहे. 

आज सकाळी एका व्हिएतनामी गिर्यारोहकाला मार्गदर्शन करत तो यशस्वीरित्या शिखरावर पोहोचला,” त्याचे मोहीम संयोजक सेव्हन समिट ट्रेक्सचे मिंग्मा शेर्पा यांनी एएफपीला सांगितले.

  • कोण आहे कामी रिता शेर्पा

कामी रीता यांचा जन्म 17 जानेवारी 1970 रोजी झाला. त्यांचा जन्म डोंगराळ भागात असलेल्या सोलुखुंबू गावात झाला. एकाच खोलीच्या घरात ते कुटुंबासह राहत होते.

याच गावात तेनसिंग नोर्गे यांचे घर होते. ज्यांनी एडमंड हिलरीसोबत पहिल्यांदा एव्हरेस्ट सर केला होता. तरुणपणात कामीला बौद्ध भिक्खू बनायचे होते आणि त्यांनी काही काळ एका मठात घालवला पण नंतर त्यांनी आपला विचार बदलला.

कामीने पहिल्यांदा 1992 मध्ये एव्हरेस्टवरील बेस कॅम्पवर स्वयंपाकी म्हणून काम सुरू केले. एका रिपोर्टनुसार, वयाच्या 12 व्या वर्षापासून त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर सामान पोहोचवायला सुरुवात केली.

नंतर 1994 मध्ये, वयाच्या 24 व्या वर्षी, त्यांनी पहिल्यांदा एव्हरेस्टवर चढाई केली आणि तेव्हापासून जवळजवळ दरवर्षी ते जगातील सर्वोच्च शिखर चढत आहेत. 2019 मध्ये, ते एका साहसी कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर देखील होते.

कामीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ते काठमांडूमध्ये पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. त्यांची इच्छा आहे की त्यांच्या मुलांनी वाचन आणि लिहावे आणि एक चांगले करिअर निवडावे जे पर्वतांवर मार्गदर्शक होण्यापेक्षा कमी धोकादायक आहे.

आपल्या विक्रमाबद्दल ते म्हणाले की, अनेक लोक विक्रम मोडण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु आम्ही विक्रम करण्यासाठी हे करत नाही. मला वाटते की नेपाळमध्ये पर्यटन कसे वाढवता येईल. आम्ही इतर गिर्यारोहकांना येथे कसे आमंत्रित करू शकतो?, यावर लक्ष केंद्रित करत आहोत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT