CBI Dainik Gomantak
देश

NEET Paper Leak: NEET पेपर लीकप्रकरणी सीबीआयची धडक कारवाई, झारखंडमधून पत्रकाराला अटक; गुजरातमध्ये सात ठिकाणी छापेमारी

NEET पेपर लीकप्रकरणी सीबीआयची धडक कारवाई सुरुच आहे. सीबीआयने शनिवारी झारखंडमधील हजारीबाग येथून एका पत्रकाराला अटक केली.

Manish Jadhav

NEET पेपर लीकप्रकरणी सीबीआयची धडक कारवाई सुरुच आहे. सीबीआयने शनिवारी झारखंडमधील हजारीबाग येथून एका पत्रकाराला अटक केली. जमालुद्दीन असे या पत्रकाराचे नाव असून तो एका हिंदी वृत्तपत्रासाठी काम करतो. शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या ओएसिस शाळेचे मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक यांना मदत केल्याच्या आरोपावरुन त्याला अटक करण्यात आली आहे. तर गुजरातमध्ये गोध्रा, खेडा, अहमदाबाद, गोध्रा आणि आनंद या सात ठिकाणी सीबीआय पथके काही संशयितांविरुद्ध छापेमारी करत आहेत. ही छापेमारी गोध्रा पोलिसांनी यापूर्वी दाखल केलेल्या एफआयआरशी संबंधित आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओएसिस शाळेचे मुख्याध्यापक एहसानुल हक आणि उपमुख्यध्यापक इम्तियाज आलम यांना कथित पेपर लीकमध्ये संशयित भूमिकेसाठी शुक्रवारी अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आलम यांची एनटीएचे पर्यवेक्षक आणि ओएसिस शाळेचे केंद्र समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पेपर लीकप्रकरणी सीबीआय हजारीबागमधील आणखी पाच जणांची चौकशी करत आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने 5 मे रोजी घेतलेल्या NEET परीक्षेसाठी मुख्यध्यापक हजारीबाग जिल्ह्याचे निरीक्षक होते.

27 जून रोजी पहिली अटक करण्यात आली होती

27 जून रोजी सीबीआयने NEET परीक्षेतील कथित अनियमिततेच्या तपासादरम्यान पहिली अटक केली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पाटणा येथून अटक करण्यात आलेल्या आशुतोष कुमार आणि मनीष कुमार या दोन आरोपींकडून कथितरित्या परीक्षार्थींना परीक्षेपूर्वी NEET चे पेपर आणि उत्तरपत्रिका देण्यात आल्या होत्या. सीबीआयने 23 जून रोजी पेपर लीकप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच्या एक दिवस आधी, शिक्षण मंत्रालयाने परीक्षेतील कथित अनियमिततेचा तपास केंद्रीय एजन्सीकडे सोपवण्याची घोषणा केली होती.

23 लाख विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती

पेपर लीक प्रकरणी सीबीआयने सहा एफआयआर नोंदवले आहेत. NTA ने देशभरातील सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये MBBS, BDS, आयुष आणि इतर संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET-UG परीक्षा आयोजित केली होती. यंदा 5 मे रोजी एकूण 571 शहरांतील 4 हजार 750 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला 23 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ST Reservation Goa: 'काँग्रेसमुळे रखडले एसटी समाजाचे राजकीय आरक्षण'; सत्ताधारी - विरोधकांची सभागृहात खडाजंगी

Satyapal Malik Death: गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन, ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shukra Gochar 2025: पैशांचा पाऊस पडणार! शुक्र गोचरामुळे बदलणार 'या' राशींचे आयुष्य

लंडनचा फिल्ममेकर गोव्यात येतो! मराठी चित्रपट महोत्सवात पर्वणी; सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव यांचे नवेकोरे सिनेमे पाहता येणार..

Goa Assembly Live: होंडा आयडीसी येथे घराला आग लागून मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT