NEET पेपर लीक प्रकरणाचा तपास करणारी CBI टीम बिहार आणि गुजरातमध्ये तपासात गुंतलेली आहे. दरम्यान NEET पेपर लीक प्रकरणी 'सेफ हाऊस'मध्ये रुम बुक करणाऱ्या मनीष प्रकाश आणि आशुतोष यांना गुरुवारी बिहारमधील सीबीआय पथकाने अटक केली.
सीबीआयने आरोपी मनीष प्रकाश आणि आशुतोषला चौकशीसाठी बोलावले होते, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पेपर लीक प्रकरणी सीबीआयने चिंटू आणि मुकेश या दोन आरोपींना रिमांडवर ठेवले आहे.
सीबीआयची दोन पथके नालंदा आणि समस्तीपूरमध्ये आहेत. तर एक पथक हजारीबाग येथे पोहोचले आहे. ओएसिस स्कूलच्या मुख्याध्यापकासह एकूण 8 जणांची सीबीआय चौकशी करत आहे.
दरम्यान, NEET पेपर लीक प्रकरणात आशुतोषची ही दुसरी अटक आहे. काही दिवसांपूर्वी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आशुतोषने पेपर लीकची कबुली दिली होती.
पेपर लीक प्रकरणी सीबीआयचे पथक हजारीबाग येथील ओएसिस स्कूलच्या मुख्याध्यापकासह आठ जणांना ताब्यात घेऊन चौकशी करत आहे. सीबीआयच्या पथकाने बुधवारी संध्याकाळीच मुख्याध्यापकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते आणि गुरुवारीही सीबीआयचे अधिकारी मुख्याध्यापकांसह स्कूलमध्ये पोहोचले.
मुख्याध्यापकांच्या चेंबरमध्येच त्यांची चौकशी करण्यात आली. सीबीआयचे सात सदस्यीय पथक स्कूलमध्ये पोहोचले असून प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगण्यात आले. तपास अधिकारी आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे गोळा करत आहेत.
काही महत्त्वाचे पुरावे सीबीआयच्या (CBI) हाती लागल्याचा दावा केला जात आहे. काल रात्री काही इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त करण्यात आली.
मनीष प्रकाश हा तोच व्यक्ती आहे ज्याने त्याचा मित्र आशुतोषच्या मदतीने परिक्षार्थींसाठी लर्न अँड प्ले स्कूल बुक केले होते. खरेतर, लर्न प्ले स्कूल, पाटणा येथे सापडलेली जळालेली NEET प्रश्नपत्रिका हा NEET पेपर लीक प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मनीष प्रकाशने प्ले अँड लर्न स्कूल रेंटवर घेतले होते.
पटणा पोलीस (Police) आणि आर्थिक गुन्हे युनिटचा संपूर्ण तपास या शाळेत सापडलेल्या जळालेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित होता. EOU टीम सातत्याने NTA कडून जळालेल्या प्रश्नपत्रिकांची माहिती घेत होती.
याचदरम्यान तपासाची लिंक या स्कूलमध्ये सापडलेल्या जळालेल्या पेपरच्या अनुक्रमांकाशी जोडली गेली. त्यानंतर हा पेपर हजारीबाग येथील ओएसिस स्कूलच्या परीक्षा केंद्रातून फुटल्याची माहिती समोर आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.