CBI
CBIDainik Gomantak

UGC NET परीक्षेप्रकरणी मोठी कारवाई; CBI कडून गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात

यूजीसी नेट परीक्षेप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

UGC-NET Exam: यूजीसी नेट परीक्षेप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. 18 जून रोजी झालेल्या या परीक्षेचा पेपर लीक झाला होता. यानंतर शिक्षण मंत्रालयाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आली होती. आता सीबीआयने आयपीसीच्या कलम 120बी (षड्यंत्र), 420 (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. सीबीआय एसीबी नवी दिल्लीचे इंस्पेक्टर सुनील कुमार यांच्याकडे या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी देण्यात आली आहे. सीबीआयला 20 जून 2024 रोजी शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय मूर्ती यांच्याकडून लेखी तक्रार मिळाली होती.

दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही परीक्षेसंदर्भात गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नेट परीक्षा रद्द करण्याबाबत प्रतिक्रिया दिली होती. नेटचा पेपर डार्कनेटवर लीक झाल्याचा खुलासा त्यांनी केला होता. यूजीसीने बुधवारी नेट परीक्षा घेतली होती, ज्यामध्ये लाखो उमेदवारांनी हजेरी लावली होती.

18 जून रोजी UGC-NET परीक्षा झाली

दरम्यान, NEET परीक्षेत हेराफेरीनंतर UGC-NET परीक्षेतही अनियमितता आढळून आली. एनटीएवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. NEET आणि NET या दोन्ही परीक्षा NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतल्या जातात. UGC-NET परीक्षा 18 जून रोजी घेण्यात आली होती आणि अवघ्या 24 तासांनंतर परीक्षा रद्द करण्यात आली.

CBI
CBI Case: 1200 कोटींचे Electoral Bond खरेदी करणाऱ्या कंपनीवर CBI कडून गुन्हा दाखल; जाणून घ्या काय आहेत आरोप

पेपर लीकचे संकेत मिळाले होते

18 जून रोजी घेण्यात आलेल्या यूजीसी नेट परीक्षेचा पेपर लीक झाल्याचे संकेत मिळाल्यानंतर शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनला (UGC) गृह मंत्रालयाच्या नॅशनल सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरच्या नॅशनल सायबर क्राइम थ्रेट ॲनालिटिक्स युनिट (NCTAU) कडून परीक्षेसंदर्भात काही इनपुट मिळाले होते. मंगळवारी झालेल्या परीक्षेत अनियमितता आढळून आल्याचे या इनपुट्सवरुन प्रथमदर्शनी दिसून येते.

तपासात धक्कादायक सत्य समोर आले

इनपुट मिळाल्यानंतर शिक्षण मंत्रालय आणि गृह मंत्रालय अॅक्शनमोड आले होते. गृह मंत्रालयाच्या नॅशनल सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) च्या नॅशनल सायबर क्राइम थ्रेट ॲनालिटिक्स डिव्हिजनने अनेक विसंगतींच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तपास सुरु केला. शैक्षणिक संस्थांच्या ऑनलाइन चॅट फोरमवर यूजीसी नेटचा पेपर आणि सोडवलेल्या पेपरबद्दल चर्चा सुरु असल्याचे तपासात समोर आले.

CBI
Delhi Excise Scam: गोवा निवडणुकीत 45 कोटींचा वापर; ईडीच्या दाव्याला आता CBI, IT ची पुष्टी

राहुल गांधी यांनी सरकारला घेरले

दुसरीकडे, गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी UGC-NET आणि NEET UG परीक्षांमध्ये पेपर लीकच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेवून सरकारवर ताशेरे ओढले. त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. राहुल म्हणाले की, "सर्व शैक्षणिक संस्था भाजपच्या लोकांनी ताब्यात घेतल्या आहेत. जोपर्यंत त्यांची सुटका होत नाही तोपर्यंत हे असेच चालू राहील."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com