Sonia Gandhi  Dainik Gomantak
देश

National Herald Case: सोनिया गांधींना ED ने बजावले समन्स, '21 जुलै रोजी हजर राहा'

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात 21 जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

Sonia Gandhi Summoned By ED: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना 21 जुलै रोजी नॅशनल हेराल्ड प्रकरणी हजर राहण्यास सांगितले आहे. सोनिया गांधी यांनी अलीकडेच प्रकृतीचे कारण सांगून ईडी मुख्यालयात हजर राहण्यापासून सूट मागितली होती.

दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधींचे (Sonia Gandhi) पुत्र आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची जवळपास 50 तास चौकशी करण्यात आली आहे. असोसिएट जर्नल लिमिटेडचा (AJL) ताबा घेण्यासाठी सोनिया गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यंग इंडियन नावाची कंपनी स्थापन केली आणि शेल कंपन्यांच्या माध्यमातून या कंपनीसाठी कर्ज घेण्यात आले, असा आरोप आहे.

तसेच, काँग्रेसने असोसिएट जनरल लिमिटेडला 90 कोटी रुपयांचे कथित कर्ज दिल्याचा आरोप आहे. हे कर्ज काँग्रेसने यंग इंडियनला दिले आणि याच आधारावर असोसिएट जर्नल लिमिटेडचे ​​बहुतांश शेअर्स सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे गेले. 90 कोटींच्या कर्जाच्या बदल्यात यंग इंडियनने काँग्रेसला केवळ 50 लाख रुपये दिल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ED) तपास करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT