Narottam Mishra  Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi ची भगवान रामाशी तुलना, कॉंग्रेस नेत्यावर भडकले मामा सरकारमधील गृहमंत्री

Narottam Mishra News: काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधी यांची भगवान राम यांच्याशी तुलना केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Salman Khurshid Controversial Statement: काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधी यांची भगवान राम यांच्याशी तुलना केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या तुलनेवरुन मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी खुर्शीद यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मिश्रा म्हणाले की, 'खुर्शीदजी 'नरा' ची तुलना नारायणाशी करणे योग्य होणार नाही. 10 जनपथचे रहिवासी असलेले राहुलजी कुठे आणि वडिलांच्या आदेशानुसार 14 वर्षे जंगलातून जंगलात भटकणारे रामजी कुठे, वानर आणि अस्वलांच्या सैन्याने लंकेचा नाश करणारे प्रभू रामजी कुठे? राहुल गांधी लढणाऱ्या भारतीय सैन्याचा (Indian Army) अपमान करत आहेत. दोघांमध्ये तुलना होऊच शकत नाही.'

त्यांच्या वक्तव्यावर आता खुर्शीद काय म्हणाले?

दरम्यान, मंगळवारी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना सलमान खुर्शीद म्हणाले की, 'जेव्हा मी कोणाची स्तुती करतो, प्रभू रामाची स्तुती करतो, तेव्हा विरोधक म्हणतात की, तुम्ही प्रभू रामाचा अपमान करत आहात. प्रभू रामावर वाद निर्माण करु नका, प्रभू राम सर्वांचे आहेत. उर्दू कवींनीही भगवान रामाचे वर्णन 'इमाम-ए-हिंद' म्हणून केले आहे. परंतु, मला वाईट म्हणण्यापूर्वी त्यांना वाईट म्हणा. नागपूरला विचारुन आम्ही आमच्या भूमिका बदलणार नाही. नागपूर हे देश चालवू शकत नाही, नागपूरने (Nagpur) आपल्या मर्यादेत वाट्टेल ते करावे, पण देश असा चालवू द्या असे सांगून देश चालवू नये.'

काय म्हणाले खुर्शीद?

सलमान खुर्शीद सोमवारी मुरादाबादमध्ये म्हणाले होते की, 'ते (राहुल गांधी) अलौकिक आहेत. आम्ही कडाक्याच्या थंडीत आणि जॅकेट घालून, टी-शर्ट घालून (भारत जोडो यात्रेसाठी) निघतोय. दुसरीकडे मात्र, ते एखाद्या योग्याप्रमाणे तपश्चर्या करत आहेत....भगवान रामाचा 'खडाऊ' खूप दूरवर जातो. कधी कधी खडाऊ घेऊन चालावे लागते. जर प्रभु राम एखादे ठिकाणी पोहोचू शकत नसतील तर, भरत त्यांची भूमिका घेतात. आम्हीही खडाऊसह उत्तर प्रदेशात चालत आहोत. खडाऊ उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) पोहोचला आहे, तर रामजीही पोहोचतील, हा आमचा विश्वास आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रविंच्या 'फ्री हँड' फॉर्म्युल्यामुळे गुन्हेगार थरथर कापत होते; आज मात्र कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

तायट जावनन ते कितें उलयतात; 'सोपो'वरुन फोंडा पालिका कर्मचाऱ्याची मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता टीका; Watch Video

Voter Adhikar Yatra: 'मतदार अधिकार यात्रे'ने राहुल गांधींना बळ, पण फायदा काँग्रेसऐवजी मित्रपक्षांना

''आशिष नेहराच्या कॉटेजला पंचायतीची परवानगी नाही'' केळशी ग्रामसभेत वादळी चर्चा

Salcette: पॉप्युलर हायस्कूलमध्ये 'चतुर्थीचा बाजार'; विद्यार्थ्यांडून सजावट, माटोळी साहित्याची विक्री

SCROLL FOR NEXT