Tamil Nadu Crime News Dainik Gomantak
देश

Crime News: रेल्वेत 54 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या; सोन्याच्या एका अंगठीने उलगडलं हत्येचं गूढ, 6 तासांत आरोपी जेरबंद

Tamil Nadu Crime News: तमिळनाडूमधील कन्याकुमारी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागरकोइल रेल्वे यार्डमध्ये उभ्या असलेल्या रिकाम्या रेल्वे डब्यात 54 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली.

Sameer Amunekar

तमिळनाडूमधील कन्याकुमारी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागरकोइल रेल्वे यार्डमध्ये उभ्या असलेल्या रिकाम्या रेल्वे डब्यात 54 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता. मात्र, महिलेच्या हातातील सापाच्या आकाराची सोन्याची अंगठी आणि त्यावरील हॉलमार्क पोलिसांसाठी महत्त्वाचा दुवा ठरला. या एका दागिन्याच्या आधारे पोलिसांनी गुजरातपासून छत्तीसगड आणि मध्य प्रदेशपर्यंत तपासाची साखळी जोडली. रेल्वे पोलिसांनी अवघ्या सहा तासांत या प्रकरणाचा छडा लावत संशयित आरोपीला अटक केली.

रेल्वे यार्डमधील रिकाम्या डब्यात आढळला महिलेचा मृतदेह

ही घटना 13 नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडल्याचे तपासात समोर आले आहे. नागरकोइल रेल्वे यार्डमध्ये एक रिकामा रेल्वे डबा उभा होता. हा डबा दुसऱ्या रेल्वेमध्ये जोडण्यापूर्वी त्याची स्वच्छता करण्याचे काम सुरू होते. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांना डब्याच्या आत एका महिलेचा मृतदेह आढळला. त्यानंतर तातडीने रेल्वे पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला. मृत महिलेच्या जवळ कोणतीही ओळखपत्रे किंवा महत्त्वाची कागदपत्रे सापडली नव्हती. त्यामुळे तिची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, तिच्या हातात असलेल्या सोन्याच्या अंगठीने संपूर्ण तपासाला दिशा दिली.

सोन्याच्या अंगठीवरील हॉलमार्कने जोडले गुजरात, रायपूर आणि मध्य प्रदेशचे धागे

मृत महिलेच्या हातातील अंगठीवर सापाच्या आकाराची आकर्षक डिझाइन होती. या अंगठीवरील हॉलमार्कचा वापर करून पोलिसांनी तिचा तपास सुरू केला. रेल्वेचे पोलीस अधीक्षक आदर्श पचेरा यांच्या माहितीनुसार, हॉलमार्कच्या आधारे ही अंगठी गुजरातमधील एका विक्रेत्याकडून तयार करण्यात आल्याचे समोर आले.

पोलिसांनी संबंधित विक्रेत्याशी संपर्क साधला. त्यावेळी ही अंगठी छत्तीसगडमधील रायपूर येथील एका सराफाला पुरवण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तपास पथकाने रायपूर गाठले. तेथे दागिना खरेदी करताना देण्यात आलेल्या पॅन कार्डच्या तपशीलावरून महिलेची माहिती मिळाली. यासोबतच मध्य प्रदेशातील तिच्या पत्त्याचाही शोध लागला.

पोलिसांनी या पत्त्याच्या आधारे कुटुंबीयांशी संपर्क साधला. संबंधित महिला मागील तीन महिन्यांपासून घरातून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवण्याचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महिलेचे पती आणि मुले कन्याकुमारीकडे रवाना झाल्याचेही सांगण्यात आले आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला संशयित; सहा तासांत आरोपीला अटक

महिलेची ओळख पटवण्याबरोबरच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. सुरुवातीला तीन संशयित व्यक्तींची नावे तपासात समोर आली होती. मात्र, रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर पोलिसांचे लक्ष एका व्यक्तीकडे केंद्रित झाले.

फुटेजमध्ये पांढरे कपडे घातलेली एक व्यक्ती रेल्वेच्या डब्यातून बाहेर पडताना दिसली होती. या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित आरोपी रेल्वे स्थानकाच्या परिसरात भटकत असे आणि भीक मागून उदरनिर्वाह करत होता. यापूर्वीही त्याची मृत महिलेशी काही वेळा भेट झाली होती. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास सुरू केल्यानंतर अवघ्या सहा तासांत आरोपीला अटक करण्यात आली.

रक्ताने माखलेला शर्ट गड्ढ्यातून जप्त

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपीने महिलेला जबरदस्तीने रिकाम्या रेल्वे डब्यात नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिच्यावर शारीरिक हल्ला केला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. गुन्ह्यानंतर आरोपीने रक्ताने माखलेला शर्ट जवळच्या एका खड्ड्यात फेकून दिला होता. पोलिसांनी हा शर्टही जप्त केला आहे.

या प्रकरणात आरोपीने कोणत्याही शस्त्राचा वापर केला नसल्याचे चौकशीत सांगितले आहे. त्याने हातांनी मारहाण केली आणि महिलेच्या छातीवर लाथ मारल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. महिलेच्या बरगड्यांना फ्रॅक्चर झाल्याचे प्राथमिक वैद्यकीय तपासणीत दिसून आले आहे.

दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून मृत्यूचे नेमके कारण आणि लैंगिक अत्याचाराची पुष्टी करण्यासाठी वैद्यकीय तपासणी केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa 39A Protest: "गोव्यातील जमीन राखण्यासाठी टीसीपी कायदा ‘39-ए’ रद्द झालाच पाहिजे"; अभिजीत दीपके यांची आक्रमक भूमिका

8th Pay Commission Salary: 8वा वेतन आयोग लागू झाल्यास पगार किती वाढणार? लेव्हल 3 ते 6 च्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे गणित

खरी कुजबुज: युतीच्या गप्पा, टेबलावर दुरावा

IND vs PAK: एकट्या तिलक वर्माची झुंज ठरली अपुरी! पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधारानं फलंदाजांना धरलं जबाबदार; म्हणाला, "...तर निकाल वेगळा असता!"

Kankumbi Forest: व्हायरल व्हिडिओतील वाघाची पटली ओळख; गोवा-कर्नाटक सीमेवरील कणकुंबी वनक्षेत्रातील 'एसकेटी-39' वाघाचे दर्शन

SCROLL FOR NEXT