Goa 39A Protest: "गोव्यातील जमीन राखण्यासाठी टीसीपी कायदा ‘39-ए’ रद्द झालाच पाहिजे"; अभिजीत दीपके यांची आक्रमक भूमिका

tcp act 39a goa repeal: गोव्यातील जमीन राखण्यासाठी नगर नियोजन कायदा ‘३९-ए’ रद्द झालाच पाहिजे, त्यासाठी दिल्या जाणाऱ्या लढ्याला आमचा सदैव पाठिंबा राहील आणि संघटित लढा दिला जाईल.
tcp act 39a goa repeal
abhijit dipkeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोव्यातील जमीन राखण्यासाठी नगर नियोजन कायदा ‘३९-ए’ रद्द झालाच पाहिजे, त्यासाठी दिल्या जाणाऱ्या लढ्याला आमचा सदैव पाठिंबा राहील आणि संघटित लढा दिला जाईल. टीसीपीचा हा कायदा रद्द झाल्याशिवाय गोव्यातील गोंय-गोवन आणि गोंयकारपण टिकणार नाही. आमची (कॉक्रोच जनता पक्षाची) चळवळ ही जाती-धर्माच्या पलिकडे समाजाला एकत्रित आणण्यासाठी आहे, असे मत कॉक्रोच पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय संयोजक अभिजीत दीपके यांनी व्यक्त केले.

पणजीतील (Panaji) कन्व्हेन्शन सेंटर येथे रविवारी ‘चल्ला कितें, गोवा’ (गोव्यात काय चाललयं?) या जाहीर जनसंवाद कार्यक्रमाद्वारे ‘सीजेपी’ने देशव्यापी मोहिमेची सुरुवात केली. त्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर सह-संयोजक व मुख्य प्रवक्ते सौरव दास, सह संयोजक आशुतोष रांका आणि राष्ट्रीय सचिव आफ्रिन नवाज यांची उपस्थिती होती. दीपके म्हणाले, की देशात मागील काही वर्षांत जाती-धर्मात फूट पाडून सत्ता मिळविली जात असल्याचे चित्र आहे. देश अखंड राहिला पाहिजे आणि त्यासाठी समाजाने एकत्रित आले पाहिजे.

tcp act 39a goa repeal
Goa ITI: "राज्यात आयटीआयचा दर्जा उंचावण्यासाठी 250 कोटी खर्च"; CM सावंतांचा 'स्किल इंडिया'वर भर

गोव्याच्या अस्तित्वाला धोका!

भ्रष्ट राजकारणी जमीन माफियांशी हातमिळवणी करून गोव्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करत आहेत. माफिया आधी ते तुमची जमीन हिरावून घेतात, त्यानंतर तुमच्या परंपरा आणि संस्कृती काढून घेतात व शेवटी तुमची ओळखच पुसून टाकतात, हे विचारात घेणे आवश्यक असल्याचे दीपके म्हणाले.

tcp act 39a goa repeal
Goa Politics: "मनोज परबांचे बिल्डर लॉबीशी लागेबांधे, 150 फ्लॅटचे काम कसे मिळाले?"; वीरेश बोरकरांचा खळबळजनक आरोप

पर्यटन उद्योगात हक्काचा वाटा कमी!

स्थानिक तरुणांना राज्याच्या पर्यटन उद्योगातील त्यांचा हक्काचा वाटा मिळत आहे का? गोवा हे एक प्रमुख पर्यटन स्थळ असूनही स्थानिक तरुणांच्या मालकीचे फार कमी पर्यटन व्यवसाय आहेत आणि नफ्यातील मोठा हिस्साही त्यांना मिळत नाही. पर्यटन क्षेत्रात गोव्यातील तरुणांना सर्वोच्च प्राधान्य मिळायला हवे, परंतु सध्या तरी त्यांना ते मिळत नाही, असे दिसते याकडेही दीपके यांनी लक्ष वेधले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.