Kankumbi Forest: व्हायरल व्हिडिओतील वाघाची पटली ओळख; गोवा-कर्नाटक सीमेवरील कणकुंबी वनक्षेत्रातील 'एसकेटी-39' वाघाचे दर्शन

viral video tiger skt 39 belagavi: एका व्हायरल व्हिडिओमध्ये दिसलेला वाघ कर्नाटकच्या बेळगावी वन विभाग कार्यक्षेत्रातील आहे. वनविभागाने नुकत्याच जारी केलेल्या स्पष्टीकरणात या वाघाची ओळख ‘एसकेटी-३९’ अशी पटविली आहे.
viral video tiger skt 39 belagavi
Kankumbi ForestDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: एका व्हायरल व्हिडिओमध्ये दिसलेला वाघ कर्नाटकच्या बेळगावी वन विभाग कार्यक्षेत्रातील आहे. वनविभागाने नुकत्याच जारी केलेल्या स्पष्टीकरणात या वाघाची ओळख ‘एसकेटी-३९’ अशी पटविली आहे. हा वाघ सह्याद्री-कोकण कॉरिडॉरमधील असून, त्याचा अधिवास महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांत पसरलेला आहे. कर्नाटकच्या वन अधिकाऱ्यांनी सांगितले, हा वाघ बेळगावीजवळील कणकुंबी (गोवा-कर्नाटक सीमेवरील गाव) वन क्षेत्रातील आहे.

गोव्यात वाघच नाही म्हणणे चुकीचे : केरकर

१. पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी याविषयावर ‘गोमन्तक''ला सांगितले की, वाघ (Tiger) हा कोणत्याही अमूक ठिकाणचाच, असे म्हणता येणार नाही. त्याचे काही त्याठिकाणी घर नाही. त्याचा अधिवास हा जंगल परिसर असतो. आता सह्याद्रीच्या सर्व भागांत फिरत असल्याने तो दृष्टीस पडत आहे.

viral video tiger skt 39 belagavi
Tiger Conservation: गोव्यातील वाघ गणनेचा अहवाल कुठे अडकला? निष्कर्ष जाहीर करण्याची राजेंद्र केरकर यांची मागणी

२. डोंगरमाथ्यावरील जलसाठे कमी होत आल्याने वाघ डोंगरावरून खाली उतरत आहे. त्यामुळे तो म्हादईच्या खोऱ्यात गोव्यासह इतर ठिकाणीही दिसत आहे. परंतु गोव्यात वाघच नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. गोवा वनविभागाकडे ‘आरटीआय’द्वारे माहिती मागितली तरी ती दिली जात नाही. एवढी असंवेदनशीलता सरकार का दाखवित आहे, हे समजत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.