Goa ITI: "राज्यात आयटीआयचा दर्जा उंचावण्यासाठी 250 कोटी खर्च"; CM सावंतांचा 'स्किल इंडिया'वर भर

cm pramod sawant skill india iti 250 crore: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘क्लीन इंडिया, स्किल इंडिया आणि फिट इंडिया’ या उपक्रमाची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे.
cm pramod sawant skill india iti 250 crore
cm pramod sawantDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘क्लीन इंडिया, स्किल इंडिया आणि फिट इंडिया’ या उपक्रमाची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. ‘स्किल इंडिया’अंतर्गत आयटीआयचा दर्जा उंचावण्यासाठी सरकारने २५० कोटी रुपये खर्च केले आहेत, असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्‍पष्‍ट केले.

झुआरी पुलावर रविवारी पहाटे ‘सीएम ट्रॉफी मॅरेथॉन’च्‍या उद्‍घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी भाजप (BJP) प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक, आमदार रूडॉल्फ फर्नांडिस, माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा आणि मान्यवर उपस्थित होते. भर पहाटेच्या या मॅरेथॉनसाठी राज्‍यातील तब्बल ५,३३१ जणांनी नोंदणी केल्‍याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

cm pramod sawant skill india iti 250 crore
Goa ITI Admission: आयटीआयमध्ये 446 मुलींनी घेतला प्रवेश; कौशल्य अभ्यासक्रमांकडे वाढता कल, मुलींसाठी शुल्क माफीचा मोठा निर्णय

‘विकसित भारत २०४७’ आणि ‘विकसित गोवा २०३७’चे लक्ष्य साध्‍य करण्‍यासाठी तरुणांनी शारीरिक तंदुरुस्‍तीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करतानाच आयर्नमॅन, टेबल टेनिस आणि बुद्धिबळ स्पर्धांच्या माध्यमातून राज्यात क्रीडाविषयक संधी वाढत असल्याचेही त्‍यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.