Kapil Sibal Dainik Gomantak
देश

"हा निर्णय माझा स्वतःचा आहे, काँग्रेसवर मी नाराज नाही": कपिल सिब्बल

ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनीही काँग्रेसला बाय बाय म्हटलं आहे.

दैनिक गोमन्तक

ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनीही काँग्रेसला बाय बाय म्हटलं आहे. काँग्रेस पक्षात असताना काही काळ संघटनात्मक बदलाचा मुद्दा बोलून दाखवणाऱ्या सिब्बल यांनी काँग्रेसशी संबंध तोडल्यानंतर माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांची प्रांजळपणे उत्तरे दिली. (My decision to leave the Congress is my own said Kapil Sibal)

दरम्यान, सिब्बल आता समाजवादी पक्षाच्या (Samajwadi Party) पाठिंब्याने अपक्ष म्हणून राज्यसभेवर जाणार आहेत. सपा सिब्बल यांना पाठिंबा देत आहे. अपक्ष म्हणून वरिष्ठ सभागृहात जाण्याचा विचार आला तेव्हा सिब्बल म्हणाले, "आमची अखिलेशजींशी चर्चा झाली होती. अनेक पक्षांनी मला ऑफर दिली होती. मात्र मी भाजपसह (BJP) अन्य पक्षात जाणार नाही असं ठरवलं होतं. तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही अपक्ष म्हणून राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरु शकता, असंही मला सांगण्यात आलं होतं. यावर अखिलेश म्हणाले की, 'तुमच्यासारखे लोक राज्यसभेवर यावेत अशी आमची इच्छा आहे. तुम्ही पक्षात आला नाही तरी चालेल.''

तसेच, इतका वेळ घालवल्यानंतर काँग्रेसला (Congress) 'बाय बाय' म्हणण्याचे कारण विचारले असता, सिब्बल म्हणाले की, पक्षात मालक-कर्मचारी नाते नसते. ते पुढे म्हणाले, "मला वाटले की 30 वर्षांनंतर आपण नवीन मार्ग स्वीकारावा. हे माझे वैयक्तिक मत आहे. हा निर्णय माझा स्वतःचा आहे. माझी काँग्रेसकडे तक्रार नाही आणि करणार नाही. पक्षाचे नेते आहेत आणि राहतील. मित्रांनो, विचारधारा आहे, त्यावर मी ठाम राहीन. मी विचारधारा सोडत नाही. होय, राज्यसभेवर अपक्ष म्हणून विजयी झालो तर मी राज्यसभेत येईन. या संदर्भात मला वाटले की, अखिलेशजी मला पाठिंबा देतायेत.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT