Syed Ahmed Bukhari Dainik Gomantak
देश

Israel-Hamas War: ''मुस्लिम देश फेल ठरले, PM मोदीच...'', जामा मशीदीचे इमाम बुखारी म्हणाले

Israel-Hamas War: इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ बॉम्बस्फोट झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ बॉम्बस्फोट झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. बुखारी म्हणाले की, 'इस्रायल-हमास संघर्षात मुस्लिम देशांनी त्यांच्या जबाबदाऱ्या पाळल्या नाहीत.' अहमद बुखारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्रायलवर राजनैतिक दबाव आणून युद्ध संपवण्याची विनंती केली. युद्धाने आधीच 21,300 हून अधिक पॅलेस्टिनींचा बळी घेतला आहे, आणखी एक मानवतावादी संकट निर्माण केले आहे आणि गाझाची एक चतुर्थांश लोकसंख्या उपासमारीने मरत आहे.

बुखारी यांनी एका निवेदनात म्हटले की, 'पॅलेस्टिनी समस्या अशा पातळीवर पोहोचली आहे जिथे या समस्येवर तात्काळ आणि कायमस्वरुपी तोडगा काढणे संयुक्त राष्ट्र, अरब लीग आणि गल्फ कोऑपरेशन कौन्सिलच्या संबंधित ठरावांनुसार सोडवणे आवश्यक आहे. "द्वि-राज्य तत्व" आवश्यक आहे.''

मुस्लीम जगताकडून म्हणावे तसे प्रयत्न झाले नाहीत

अहमद बुखारी पुढे म्हणाले की, ''मुस्लीम जगताने या संदर्भात आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत आणि जी पावले उचलायला हवी होती ती उचलली नाहीत हे अत्यंत दुर्दैवी आहे. परंतु मला आशा आहे की, माझ्या देशाचे पंतप्रधान युद्ध संपवण्यासाठी राजनैतिक दबाव आणतील आणि इस्रायलच्या पंतप्रधानांशी त्यांच्या वैयक्तिक संबंधांवर आधारित समस्यांचे निराकरण करतील.''

दुसरीकडे, इस्रायल-हमास संघर्षात तात्काळ मानवतावादी युद्धविराम तसेच सर्व ओलीसांची बिनशर्त सुटका करण्याची मागणी करणार्‍या या महिन्याच्या सुरुवातीला संयुक्त राष्ट्र महासभेत भारताने ठरावाच्या मसुद्याच्या बाजूने मतदान केले.

हमासने 1200 जणांची हत्या केली

दरम्यान, 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला केला, या हल्ल्यात सुमारे 1200 इस्रायली लोकांचा मृत्यू झाला. याशिवाय, 240 लोकांना ओलीस ठेवण्यात आले असून त्यात महिला, लहान मुले आणि वृद्धांचा समावेश आहे. यातील अनेक ओलिसांची सुटका करण्यात आली आहे, तर अनेकांचे मृतदेहही सापडले आहेत. या युद्धात गाझामध्ये आतापर्यंत 20 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT