Israel-Hamas War: इस्रायल-हमास युद्धाचा आज 83 वा दिवस आहे. युद्धादरम्यान, इस्रायली सैन्यात भरती देखील सुरु आहे. दुसरीकडे, अनेक तरुण इस्रायली संरक्षण दलात सामील होण्यास नकार देत आहेत. हिंसा हा कोणत्याही हिंसेवर उपाय असू शकत नाही, असे त्यांचे मत आहे, त्यामुळे संरक्षण दलात सामील होऊन ते पॅलेस्टाईनविरुद्ध लढू शकत नाहीत. मात्र अशा तरुणांशी सरकार कठोरपणे वागत आहे.
इस्रायल-हमास युद्धादरम्यान इस्रायली सैन्यात भरती होण्यास नकार दिल्याने 18 वर्षीय इस्रायली तरुणाला 30 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे, असे अमेरिकन नियतकालिक टाइमच्या वृत्तात म्हटले आहे. "माझा विश्वास आहे की हिंसा हा कोणत्याही हिंसेवर उपाय असू शकत नाही," तुरुंगात बंद तरुण ताल मिटनिकने तेल हाशोमर लष्करी तळावर जाण्यापूर्वी सांगितले, मेसरवोटच्या X अकाऊंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार. गाझावरील हल्ल्याने हमासने केलेल्या क्रूर नरसंहाराचे समाधान होणार नाही. हिंसा कोणत्याही हिंसेवर उपाय असून शकत नाही. म्हणूनच मी अशा लष्करी कारवाईत भाग घेण्यास नकार दिला," असेही त्याने पुढे म्हटले.
व्हिडीओमध्ये 18 वर्षीय तरुण म्हणत आहे की, 'मी सैन्यात भरती होण्यास नकार दिल्याने मला तेल हाशोमर तुरुंगात पाठवले जात आहे.' यानंतर मिटनिकच्या समर्थनार्थ लष्करी तुरुंगाबाहेर अनेक लोक जमले. मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, जर मिटनिकने सैन्यात पुन्हा भरती होण्यास नकार दिला तर त्याची प्रारंभिक तुरुंगवासाची शिक्षा 30 दिवसांपेक्षा जास्त वाढू शकते.
दुसरीकडे, युद्ध सुरु झाल्यानंतर सुमारे 12 आठवड्यांनंतर इस्रायली सैन्याने बॉम्बस्फोट आणि हल्ल्यांचे बळी ठरलेल्या गाझावासीयांच्या निराशेच्या काळात ही बातमी आली आहे. हमास संचालित गाझा आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत इस्रायली हल्ल्यांमध्ये 20,000 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. यूएनच्या अहवालात असा इशाराही देण्यात आला आहे की, गाझामध्ये अर्धा दशलक्षाहून अधिक लोक उपासमारीने मरत आहेत आणि दररोज उपासमारीचा धोका वाढत आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवादी हल्ल्यात ओलिस घेतलेल्या सुमारे 250 लोकांना पूर्णपणे मुक्त न केल्याने इस्रायलमध्ये पंतप्रधान नेतन्याहू यांच्या विरोधात संताप वाढत आहे. दुसरीकडे, युद्धाला 80 दिवसांपेक्षा जास्त कालावधी होऊनही इस्रायली लष्कर हमासचा खात्मा करु शकलेले नाही. जगभरातील इतर देशांमध्येही इस्रायलबद्दलची सहानुभूती कमी होताना दिसत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.